एमआयएम काडादींच्या बाजूने, कारखाना बंद पाडणारे निवडणुकीत पडणार
By राकेश कदम | Updated: June 22, 2023 18:23 IST2023-06-22T18:23:17+5:302023-06-22T18:23:26+5:30
एमआयएम पक्ष काडादी यांच्या बाजूने राहिल असेही शाब्दी म्हणाले.

एमआयएम काडादींच्या बाजूने, कारखाना बंद पाडणारे निवडणुकीत पडणार
सोलापूर : महापालिकेने भाजपच्या दबावापाेटी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीवर कारवाई केली. चिमणी पाडायला लावणाऱ्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव हाेईल अशी टीका एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी गुरुवारी केली. एमआयएम पक्ष काडादी यांच्या बाजूने राहिल असेही शाब्दी म्हणाले.
चिमणी पाडकामानंतर अनेक पक्षाचे नेते धर्मराज काडादींची भेट घेत आहेत. एमआयएमचे फारुख शाब्दी आणि माजी नगरसेवकांनी गुरुवारी सायंकाळी काडादी यांची भेट घेतली. कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन दिले. शाब्दी म्हणाले, सिद्धेश्वर कारखाना राज्यातील नावाजलेला कारखाना आहे. हा कारखाना बंद पाडून कामगारांना देशोधडीला लावून विमानसेवा सुरू करण्यात काहीही अर्थ नाही.
साेलापूरला विमानसेवा आवश्यक आहे. मात्र कारखाना ही महत्त्वाचा आहे. शासनाने कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी. यावेळी गाझी जहागीरदार, कोमारो सय्यद, मोहसीन मैंदर्गीकर, वाहिदा भंडाले, जुबेर शेख, अशपाक बागवान जमीर शेख, सत्तार शेख, जावेद शेख आदी उपस्थित हाेते.