शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

इम्रान खानने सांगितले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत : असदोद्दिन ओवैसी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 11:05 IST

सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवैसी यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर केली जोरदार टीका

ठळक मुद्देकाश्मीर कुणाच्या बापाचे नाही हे मोदी आणि इम्रान खान यांनी लक्षात घ्यावे -  ओवैसी पाकिस्तानात लष्कराच्या मदतीशिवाय निवडणुका होत नाहीत -  ओवैसीया देशातील अनेक वंचित जमाती, दलित मोदींना पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाहीत -  ओवैसी

सोलापूर : नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान झाले तर काश्मीरची समस्या दूर होईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. आमच्या देशातील निवडणुकीबाबत वक्तव्य करण्याची इम्रान खानची एवढी हिंमत कशी झाली? इम्रान कितीही सांगत असला तरी येथील वंचित समाज मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाही. इम्रानच्या तोंडात मिठाईऐवजी मिठाचा खडा पडेल, अशी टीका एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवैसी यांनी केली. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी येथील पार्क स्टेडियमवर जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

 ओवैसी म्हणाले, काश्मीर कुणाच्या बापाचे नाही हे मोदी आणि इम्रान खान यांनी लक्षात घ्यावे. तो भारताचा हिस्सा आहे आणि कायम भारताचा हिस्सा राहील. पाकिस्तानात लष्कराच्या मदतीशिवाय निवडणुका होत नाहीत. पण आज त्या देशाचा पंतप्रधान आणि लष्कर आमच्या देशातील निवडणुकीबाबत बोलत आहेत. सोलापुरातही बडे बडे खान आणि ओरिजनल पठाण आहेत. शिवाय या देशातील अनेक वंचित जमाती, दलित मोदींना पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाहीत. आम्ही इम्रानच्या तोंडात मिठाचा खडा टाकू, त्याचे तोंड काळे करु, असेही ओवैसी यांनी सांगितले.  

या सभेला माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय मोरे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, आमदार वारीस पठाण, लक्ष्मण माने, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, चरणसिंह टाक,  तौफीक शेख, सुजात आंबेडकर, शंकरराव लिंगे, सचिन माळी, श्रीशैल गायकवाड, समीउल्लाह शेख, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अजित गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर