सहा महिने अत्याचार करून मातृत्व लादले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:26+5:302021-07-01T04:16:26+5:30

वैराग : बार्शी तालुक्यातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस आई आजारी असल्याच्या कारणावरून उचलून नेले. सहा महिने ...

Imposed motherhood by torturing for six months | सहा महिने अत्याचार करून मातृत्व लादले

सहा महिने अत्याचार करून मातृत्व लादले

वैराग : बार्शी तालुक्यातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस आई आजारी असल्याच्या कारणावरून उचलून नेले. सहा महिने दुष्कर्म करून मातृत्व लादल्याची फिर्याद मंगळवारी वैराग पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

पोलीस सूत्रांनुसार सप्टेंबर २०२० च्या काळात पीडित मुलीची आई आजारी असल्याचे सांगून तिला पाहण्यासाठी दवाखान्यात जा असे सांगण्यास राधा गाडेकर, कविता गाडेकर, चित्रा गुंड व चंदू गाडेकर हे घरी आले. यावेळी पीडितेने नको म्हटले असता जबरदस्तीने चंदूच्या गाडीवर बसवून दवाखान्याऐवजी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात नेऊन डांबून ठेवले. सप्टेंबर २०२० पासून २४ मे पर्यंत चंदूने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान आईशी संपर्क करू दिला नाही. नंतर २४ मे रोजीच दुचाकीवरून स्वतःच्या मूळ गावी घेऊन गेला व दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आणून सोडले. आईने चौकशी केली असता घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी पीडित मुलीस चक्कर येऊ लागल्याने तुळजापूर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ती मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेने आईसोबत येऊन वैराग पोलिसांत वरीलप्रमाणे फिर्याद दिली.

याप्रकरणी चंदू महादेव गाडेकर, राधा महादेव गाडेकर, कविता नंदू गाडेकर, चित्रा शिवाजी गुंड, साळू दत्तात्रेय पसारे, दत्तात्रय पसारे अशा सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे करीत आहेत.

Web Title: Imposed motherhood by torturing for six months