अक्कलकोटमध्ये बेकायदा जमाव जमवून जीवघेणा हल्ला; सहाजणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:15 IST2021-06-11T04:15:52+5:302021-06-11T04:15:52+5:30

अक्कलकोट : माझ्या बायकोकडे का बघत थांबला होता, असा जाब विचारत बेकायदा मंडळी जमवून फिर्यादीच्या पुतण्यासह पाचजणांना लोखंडी ...

Illegal mob attack in Akkalkot; Crime against six | अक्कलकोटमध्ये बेकायदा जमाव जमवून जीवघेणा हल्ला; सहाजणांविरुद्ध गुन्हा

अक्कलकोटमध्ये बेकायदा जमाव जमवून जीवघेणा हल्ला; सहाजणांविरुद्ध गुन्हा

अक्कलकोट : माझ्या बायकोकडे का बघत थांबला होता, असा जाब विचारत बेकायदा मंडळी जमवून फिर्यादीच्या पुतण्यासह पाचजणांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. ९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता बुधवार पेठ वडार गल्ली येथे हा प्रकार घडला.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी परशुराम मंजुळे यांचा पुतण्या अमोल याच्यासह काही मुले वडार गल्लीत ९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता क्रिकेट खेळत होती. तेव्हा बॉल जवळील मंदिराच्या छतावर जाऊन पडला. तेव्हा अनिल हा बॉल काढण्यासाठी मंदिरावर गेला होता. तेव्हा आरोपी अंबना पवार तेथे आला. तेव्हा बाळू पवार, संदीप पवार, समर्थ पवार, नीलाबाई कृष्णा पवार, नागना पवार (सर्व रा. वडार गल्ली, बुधवार पेठ अक्कलकोट) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून अनिल यास तू मंदिरावर जाऊन माझ्या बायकोकडे का बघत थांबला होता, असा जाब विचारत लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकूड, लाथाबुक्क्या यांनी जीवघेणा हल्ला करून मारहाण केली, अशी तक्रार नोंदली आहे. त्या घटनेत फिर्यादी परशुराम, पत्नी उज्ज्वला, ऐश्वर्या, विमल, पुतण्या विनोद (सर्व रा. बुधवार पेठ अक्कलकोट) हे गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सपोनि देवेंद्र राठोड करीत आहेत.

----

Web Title: Illegal mob attack in Akkalkot; Crime against six