शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

निवडून यायचे असेल तर शिंदे यांनी माझ्याकडे यावे; आडम मास्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:18 IST

पराभवाचा धोका टाळण्यासाठी सुशीलकुमार शिंदे लोकांच्या लग्नाला, बारशाला जात आहेत, त्याऐवजी त्यांनी माझ्याकडे यावे ... - आडम मास्तर

राजकुमार सारोळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात माकप काँग्रेस आघाडीबरोबर जात आहे, पण सोलापुरात माकपचे आडम मास्तर आक्रमक झाले आहेत. अशात पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले म्हणून पक्षाने त्यांना  केंद्रीय कमिटीतून तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे, या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली ही बातचित.

प्रश्न : मास्तर, तुम्ही ५२ वर्षे माकपमध्ये राहून निष्ठेने काम केलेले असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने कमिटीतून निलंबित केले, याबद्दल काय वाटते.उत्तर : पक्षाने माझ्यावर केलेली कारवाई योग्य आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मी भाजपने आयोजित केलेल्या विकासकामांच्या शुभारंभ व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेले कौतुकाचे शब्द अनावधानाने आले. यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धोका पोहोचू शकतो. निवडणुकीत भाजपवाले माझ्या मुद्याचा फायदा घेऊ शकतात. मी असे कौतुक करायला नको होते.

प्रश्न : पक्षाच्या कारवाईनंतर आता तुमची भूमिका काय आहे.उत्तर : पक्षाने मला तीन महिन्यांसाठी केंद्रीय कमिटीतून निलंबित केले आहे. देशातून असे १0५ तर महाराष्ट्रातून चार जण आहोत. केंद्रीय बैठकांना मला उपस्थित राहता येणार नाही, पण लोकसभा निवडणुकीचे कामकाज पाहण्याची जबाबदारी कायम आहे. या कारवाईनंतर मलाही पश्चाताप होतोय, देशभरातून फोन आले. पण आता नाईलाज आहे.

प्रश्न : लोकसभेसाठी भूमिका काय असणार आहे.उत्तर : केंद्रामध्ये काँग्रेसबरोबर आघाडी झाली तरी सोलापुरात आमचे जमलेले नाही. मी शहर मध्यची जागा मागितली आहे. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रेमाखातर ही जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांना याची किंमत मोजावी लागेल. एमआयएम व बहुजन वंचित आघाडी असल्याने याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शिंदे यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी आहे.

४२0 मी अजून विसरलो नाहीआमदार प्रणिती शिंदे यांनी १४ डिसेंबर २0१४ रोजी कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढून माझ्यावर ४२0 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सुटी असताना कलेक्टरला आॅफिसला बोलावून घेतले होते, हे मी विसरलेलो नाही. एकीकडे गरिबांसाठी काम करतो असे दाखवून घरकुलास खोडा घातला.

मुलीचे प्रेम बाजूला ठेवावे!लोकसभेवर निवडून यायचे असेल तर सुशीलकुमार शिंदे यांनीच विचार करावा व माझ्या घरी यावे. निवडून येण्याची चिंता त्यांनी माझ्यावर सोडावी. शिंदे लोकांच्या लग्नाला, बारशाला जात आहेत, त्यापेक्षा माझ्याकडे आले तर मोठी ताकद मिळेल. मुलीचे प्रेम त्यांनी थोडे बाजूला ठेवावे. मी ही बाब राहुल गांधी व सीताराम येचुरी यांच्या कानावर घातली आहे. भाजपला सत्तेपासून रोखणे हा आमचाही उद्देश आहे. भाजप फॅसिस्ट राजवट आणून पाहत आहे, अशात भाजप पुन्हा सत्तेवर आले तर मात्र पुढील निवडणुका विसराव्या लागतील. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसPraniti Shindeप्रणिती शिंदे