कारवाई कराल तर हात-पाय तोडेन... धमकी देत टिपर पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:26 IST2021-01-16T04:26:06+5:302021-01-16T04:26:06+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोटर वाहन निरीक्षक युवराज पाटील अकलूज हे वाहन तपासणीसाठी सरकारी गाडी क्र. एमएच ४ ईपी ...

कारवाई कराल तर हात-पाय तोडेन... धमकी देत टिपर पळविला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोटर वाहन निरीक्षक युवराज पाटील अकलूज हे वाहन तपासणीसाठी सरकारी गाडी क्र. एमएच ४ ईपी ४५४५ ने चालक संतोष मच्छिंद्र मखरे (रा. इंदापूर , जिल्हा पुणे) यांंच्यासह टेंभुर्णीहून कुर्डुवाडीकडे जात असताना समोरून माती भरून आलेल्या टिपर एमएच -४५, डी-१३९२ थांबवून तपासणी केली. टिपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माती असण्याची शंका आल्याने टिपरवरील अंदाजे २५ ते ३० वयाचा अनोळखी चालकास संबंधित टिपर वजन काट्यावर घेण्यासाठी सांगितले.
यावेळी चालकाने खाली उतरून माझ्यावर कारवाई कराल तर हात पाय तोडून टाकीन अशी धमकी देत माझ्यावर कशी कारवाई करताय ते बघतोच असे म्हणत वाहन वजन काट्यावर घेतो असे सांगून वाहन अचानक चालू करून आम्हाला दुखापत होईल याचा विचार न करता टेंभुर्णीच्या दिशेने पळवून नेला. याबाबत युवराज पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात टिपर चालकाविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्रीमंत रणदिवे करीत आहेत.