शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Lokmat Special; सोलापुरी मुछें हो तो अभिनंदन जैसी..!

By appasaheb.patil | Updated: March 3, 2019 21:05 IST

सोलापूर : पाकिस्तानातून परतलेले अभिनंदन वर्धमान हे सध्या जेवढे चर्चेत आले, तेवढ्याच त्यांच्या मिशाही लोकप्रिय ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ...

ठळक मुद्देपाकिस्तानातून परतलेले अभिनंदन वर्धमान हे सध्या जेवढे चर्चेत सोलापुरातील अशा वेगळ्या मिशीधारी मंडळींचा ‘लोकमत’ टीमनं घेतला शोध

सोलापूर : पाकिस्तानातून परतलेले अभिनंदन वर्धमान हे सध्या जेवढे चर्चेत आले, तेवढ्याच त्यांच्या मिशाही लोकप्रिय ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील अशा वेगळ्या मिशीधारी मंडळींचा ‘लोकमत’ टीमनं घेतला शोध. या मिशा वर्षानुवर्षे जपण्यासाठी त्यांना किती करावी लागली यातायात, याचीही घेतली माहिती.

सहकारमंत्र्यांचा मिशीवाला पीएवडिलांची इच्छा होती की, मिशा राखाव्यात म्हणून मी मिशा ठेवण्यास सुरुवात केली आता माझी ओळख फ्रेंचकट असलेला पीए अशी झाली आहे, असे सांगतात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे स्वीय सहायक असिफ महंमद युसूफ शेख. पत्नी, घरातील लोक अन् मित्रही मिशांचा लूक चांगला असल्याने चेहºयाला वेगळेपण आल्याचे सांगतात. मला मिशावाला पीए म्हणून ओळखतात. मी जरी मिशा काढायचे म्हटले तर घरचे लोक काढू देत नाहीत.

मिशीची स्टाईल आजोबांसारखीचमाझ्या मिशीला पत्नीने एकदाच विरोध केला होता. पण ‘मिशी माझी शान आहे’ असे तिला सांगितले. त्यानंतर मात्र पत्नीने कधी विरोध केला नाही. ही मिशी आणखी भरदार करणार आहे, असे कुमठ्यातील रामचंद्र शिवशरण सांगतात. शेतीकाम करणारे व ट्रॅक्टर चालक असलेले ३६ वर्षीय रामचंद्र यांनी गेल्या चार वर्षांपासून या स्टाईलची मिशी ठेवली आहे. त्यांच्या आजोबांच्या मिशाही भरदार होत्या. त्या पाहूनच त्यांनीही मिशीची स्टाईल ठेवली.

खाकीतल्या ‘सिंघम’ला लोकांचा सॅल्युटकारंबा येथील ग्रामीण पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर काम करणारा सुहास नारायणकर हा मिशीमुळे ‘सिंघम’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला आहे़ शहीद पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्याप्रमाणेच त्याने आपल्या डोक्यावर टक्कल ठेवले आहे. शिवाय मिशीही ठेवली आहे़ मागील दोन दिवसांपासून अभिनंदन यांचा विषय चर्चेत आल्यापासून सुहासकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला आहे़ दोन दिवसांपासून सुहास यास ‘तू अभिनंदनसारखा दिसतोच, तुलाही सलाम आम्ही करतो,’ असे कित्येक मित्रांनी प्रतिक्रिया दिली़ 

मिशांसाठी महिन्याला अडीच हजार खर्चमिशांचा आकार बदलू नये, यासाठी गुरुद्वारा असलेल्या ठिकाणांहून म्हणजे नांदेड, बीदर येथून खास जेल मागवतो. महिन्याकाठी दाढी अन् मिशाला कट मारण्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येतो, असे फेटे बांधणारे क्षत्रिय गल्लीतील राजू पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राजू म्हणाले, मी ४० वर्षांपासून ही आगळी-वेगळी मिशी ठेवली आहे. आजपर्यंत कधीच याचा आकार चुकविला नाही. एक-दोन दाढी घरी करतो आणि जेव्हा मिशाला आकार द्यावयाचा असतो त्यावेळी मी खास दुकानात जाऊन मिशाला आकार देतो. 

मिशीसाठी रोज सलूनमध्येकितीही गर्दी असो... त्या गर्दीत माझी मिशीच माझी ओळख असते. आता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यामुळे माझी ही मिशी लोकप्रियच होईल, असे बांधकाम व्यावसायिक भागवत जेटिंगा जोगधनकर यांनी सांगितले. रोजच्या रोज दाढी करतो. सलून दुकानदारही ठरलेला. मिशीला चांगला आकार मिळावा म्हणून मी दाढी घरात कधीच करीत नाही. दुकानदारही खूप वेळ देत माझी मिशी कशी उठावदार दिसेल, याकडे कटाक्षाने पाहतो. 

आकार देण्यासाठी रोज अर्धा तासपोलीस दलात नियुक्त झाल्यावर मी माझ्या मिशीला वेगळा आकार दिला. १६ वर्षांपासून मी या मिशीची ठेवण बिघडू दिली नाही, अशी माहिती ग्रामीण पोलीस दलातील कॉन्स्टेबल प्रशांत सुरवसे यांनी दिली. मी दररोज सकाळी दाढी करतो. घरातच दाढीचे साहित्य असल्याने अर्धा तास यासाठी मी वेळ देतो. दाढी करताना मिशीला कुठेच धक्का लागणार नाही, याची काळजी घेतो. गालापर्यंत आलेल्या मिशीला आकार देताना बारकावे पाहावे लागतात, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानLokmat Eventलोकमत इव्हेंट