रेशन धान्य पाहिजे तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या; सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 11:27 AM2021-12-02T11:27:03+5:302021-12-02T11:27:08+5:30

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का अत्यल्प असल्याने लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेतला आहे.

If ration grain is desired, take both doses of corona; Decision of Solapur District Administration | रेशन धान्य पाहिजे तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या; सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

रेशन धान्य पाहिजे तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या; सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Next

सोलापूर : शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करताना कोरोनाचे दोन्ही डोस बंधनकारक करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने बुधवारी सर्व रेशन दुकानदारांना दिले आहे. याची अंमलबजावणी गुरुवारपासून होणार आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन दुकानदारांची बैठक घेतली. बैठकीत जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का अत्यल्प असल्याने लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेतला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात आठ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामुळे निम्मी लोकसंख्या रेशन दुकानांशी संबंधित आहे. कार्डवरील सर्व सदस्य कोरोना लस घेतलीय का, याची चाचपणी करण्याचे आदेश दुकानदारांना दिले आहेत. पहिला डोस घेतला असेल आणि दुसरा डोस घेतलेला नसेल तरी संबंधितांना धान्य देऊ नका, अशा सूचना आहेत, असे रेशन दुकानदारांनी सांगितले आहे.

 

Web Title: If ration grain is desired, take both doses of corona; Decision of Solapur District Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.