शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला तालुक्यातून प्रस्ताव आल्यास दोन दिवसांत टँकर सुरू करू - आ. गणपतराव देशमुख यांची आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:58 IST

सांगोला तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक आ. गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

ठळक मुद्देपावसाअभावी पेरण्या झालेल्या नसल्याने दुष्काळ जाहीर करावा - देशमुख अधिकारी व कर्मचाºयांनी गाफील न राहता आवश्यक त्या उपाययोजना वेळीच पूर्ण कराव्यात - देशमुख

सांगोला : सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ चारा व पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़ मागणीचे प्रस्ताव आल्यास दोन दिवसांत टँकर सुरू करावेत. अधिकारी व कर्मचाºयांनी गाफील न राहता आवश्यक त्या उपाययोजना वेळीच पूर्ण कराव्यात, अशा सूचना आ़ गणपतराव देशमुख यांनी अधिकाºयांना दिल्या.

तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक आ. गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते़ या बैठकीस प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, सभापती डॉ. श्रुतिका लवटे, उपसभापती शोभा खटकाळे, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, झेडपी सदस्य अ‍ॅड. सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, तानाजी पाटील, चंद्रकांत शिंदे, अशोक शिंदे, शहाजीराव नलवडे, बाळासाहेब काटकर, गिरीश गंगथडे, माजी सभापती मायाक्का यमगर उपस्थित होते.

आ. गणपतराव देशमुख यांनी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती, वाड्या-वस्त्यांवर योजनांची कामे चालू आहेत का, याविषयी माहिती घेतली़ कृषी विभागाकडून खरीप व रब्बी पिकांच्या परिस्थितीची माहिती घेऊन मागेल त्याला शेततळे या योजनेतून प्रत्येक गावाने पाच शेततळ्यांचे प्रस्ताव द्यावेत, अशा सूचना केल्या. यावेळी जलसंधारणाच्या पाझर तलाव, सिमेंट बंधाºयाविषयी माहिती घेतली. टेंभूतून बुद्धेहाळ तलावात किती पाणी आले, या योजनेतून बलवडी व नाझरे येथील बंधारे भरून देण्याविषयी सूचना केल्या.

गटविकास अधिकारी संतोष राऊत म्हणाले, २०१९ पर्यंत ९२ टँकर उपलब्ध करण्याबरोबर विहीर खोदाई, गाळ काढणे, अधिग्रहण, हातपंप या योजनांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात ३ लाख ६२ हजार जनावरांसाठी पुढील तीन महिने पुरेल इतका २८ लाख १८ हजार ३१९ क्विंटल चारा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

तालुक्यातील क्षेत्र रब्बीचे असून, पावसाअभावी पेरण्या झालेल्या नसल्याने दुष्काळ जाहीर करावा. पशुधन जगविण्यासाठी तत्काळ चारा डेपो सुरु करावेत, परिस्थितीनुसार छावण्या उघडाव्यात. टेंभू, म्हैसाळ योजनांची कामे मुदतीत पूर्ण करावीत. टेंभू व म्हैसाळ योजनेतून माण, कोरडा नदीवरील बंधारे, पाझर तलाव भरून द्यावेत. गावात मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी पाणंद रस्ते, विहिरी, शेततळे या कामांचे जास्तीत जास्त प्रस्ताव द्यावेत, हे ठराव करण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखWaterपाणी