शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

युती होणार का या फालतू चर्चेत जात नाही, आमचा निर्णय झालाय! - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 18:13 IST

देशातील पाच राज्यात भाजपाचा सुफडा साफ झाला असून आता ते तोंड वर काढू शकत नाहीत.

सोलापूर -  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे जाहीर सभा घेतली. पंढरपूरच्या या मैदानात सभा घेण्याचं धाडस शिवसेनेनं दाखवलंय, असे म्हणून उद्धव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.  देशातील पाच राज्यात भाजपाचा सुपडा साफ झाला असून आता ते तोंड वर काढू शकत नाहीत. अयोध्येतही मी झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला गेलो होतो अन् पंढरपुरातही मी त्याच्यासाठीच आलो आहे. कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू सोडणार नाही, अशा शब्दात भाजपा अन् मोदींना उद्धव ठाकरेंनी लक्ष्य केलं.  तसेच शेतकरी कर्जमाफी, राम मंदिर, मल्ल्या, नीरव मोदी, आगामी युतीसह इतरही मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

खास पंढरपूरसाठी विठाई बससेवेचं उद्घाटन

समोरचा गोरगरीब हाच शिवसेनेचा देव.

धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी. 

कुंभकर्णाला जागं करायला मी अयोध्येत गेलो होतो. 

राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच 

जे करून दाखवतो तेच बोलतो, जे बोललो ते करून दाखवतो

सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार

राम मंदिर दिखेगा कब ?

बाबरी पाडून घेतली, बाबरीच्या मुद्दावरून गादी बळकावलीत आणि त्यावर  कुंभकर्णासारखे लोळताय ?

सोहराबुद्दीन खटल्यातील सगळे निर्दोष मुक्त झाले, मात्र बाबरी पाडणाऱ्यांविरोधातील खटले अजून सुरू आहेत

30 वर्षे होत आली, आता तुम्ही सांगता की न्यायालयात हा मुद्दा आला आहे?

हिंदू भोळा आहे, मात्र तो बावळट नाही

राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे, एनडीएतील किती पक्ष विरोधात आहे आणि किती समर्थनात आहे हे कळेल.

राम मंदिराबाबत नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांचे मत काय आहे ?

जे नितीश संघमुक्त भारत करायला निघाले होत त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसलंय.

नितीशकुमार आणि रामविलास यांच्यापुढे भाजपने नमतं घेतलं, चांगली गोष्ट आहे.

शेतकरी हा काही मल्ल्या, मोदी नाही.

गोरगरिबांना नाडण्याचा प्रयत्न केलात तर त्याची गाठ शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवा.

गावागावातील शिवसेनेच्या शाखा, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आधाराचे केंद्र बनेल

शिवसेना निवडणुका बाजूला ठेवून गोरगरिब, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे

पीकविम्याचे पैसे केव्हा देताय? कर्जमाफी झालेला शेतकरी कधी दाखवताय ते सांगा

मी सरकारला इशारा देतोय, कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय?

मला जागावाटपात स्वारस्य नाही, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे

काँग्रेसचं अपत्य तुम्ही का मांडीवर घेता, कशाला त्याला दूध पाजता ?

देवांच्या नावाने जुमला केलात तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सुटू देणारही नाही

महाराष्ट्रावरचं संकट टाळण्यासाठी पांडुरंग पाहिजे, दुष्काळ निवारणासाठी पांडुरंग पाहिजे तर मग मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडा, पांडुरंगच तिथे बसेल.

शिवसेनेचं राज्य आणणार म्हणजे, आणणारच

छत्तीसगडमधल्या लोकांनी घाण पहिले साफ केली, याला म्हणतात धाडस आणि हे धाडस मला शिवरायांच्या महाराष्ट्राकडून अपेक्षित आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPandharpurपंढरपूर