ट्रकने ठोकरल्याने बर्फ विक्रेता जागीच ठार
By Admin | Updated: June 2, 2014 00:44 IST2014-06-02T00:44:19+5:302014-06-02T00:44:19+5:30
भावासमोरच घेतला शेवटचा श्वास

ट्रकने ठोकरल्याने बर्फ विक्रेता जागीच ठार
सोलापूर : बर्फाची लादी घेऊन जाणार्या अ.रजाक साचे (वय ४०) या बर्फ विक्रेत्याला समोरुन येणार्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. शिरवळ शिवारात कणबस-करजगी रस्त्यावर ही घटना घडली. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान अ.रजाक इमाम साचे हा दुचाकीवरुन करजगीकडे बर्फ घेउन जाताना समोरुन येणार्या ट्रकची जोरात धडक झाली. त्यात गंभीर जखमी झाल्याने अ.रजाक साचे याचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागून येणारा त्याचा बर्फविक्रेता भाऊ खाजाभाई याच्यासमोरच ही दुर्घटना घडली. जखमी रजाकने आपल्या समोरच शेवटचा श्वास घेल्याने भाउ खाजाभाईने हंबरडा फोडला़ अपघातास कारणीभूत ठरलेला चालक ट्रक सोडून फरार झाला आहे. ख्वाजाभाई याने वळसंग पोलिसांत फिर्याद दिली. हे. कॉ. लक्ष्मण कुर्ले अधिक तपास करीत आहेत. बेदरकार ट्रक चालवून नगारीकांचे बळी घेणर्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे़