चुलत्यांच्या निधनाचा फोटो मोबाईलवर पाहिला,धक्का बसून पुतण्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST2021-05-10T04:22:12+5:302021-05-10T04:22:12+5:30

सोलापुरात राहणारे बंडू ऊर्फ बाळासाहेब धर्मा शेजाळ (वय ५१) यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

I saw a photo of my cousin's death on my mobile phone | चुलत्यांच्या निधनाचा फोटो मोबाईलवर पाहिला,धक्का बसून पुतण्याचा मृत्यू

चुलत्यांच्या निधनाचा फोटो मोबाईलवर पाहिला,धक्का बसून पुतण्याचा मृत्यू

सोलापुरात राहणारे बंडू ऊर्फ बाळासाहेब धर्मा शेजाळ (वय ५१) यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १५ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी सकाळी बंडू शेजाळ यांचा मृत्यू झाला. त्यांचा पुतण्या अजय विलास शेजाळ (वय ३७) हा अन्य एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारादरम्यान तो रोजच काकांची तब्येत कशी आहे, अशी विचारणा करीत होता. त्यांचा धोका टळला हे ऐकून त्याला बरे वाटायचे. त्याच्याही तब्येतीत फरक पडत गेला.

शनिवारी सकाळी बंडू शेजाळ यांच्या मृत्यूची बातमी अजयने मोबाईलवर पाहिली. या बातमीने तो अस्वस्थ झाला आणि अवघ्या दोन तासांत त्यानेही प्राण सोडले. चुलत्या-पुतण्याचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने अंत्रोळी गावावर शोककळा पसरली. शेजाळ कुटुंबातील या दोन्ही प्रमुख व्यक्तींच्या निधनाने १२ सदस्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

फोटो

०९बाळासाहेब शेजाळ

०९अजय शेजाळ

Web Title: I saw a photo of my cousin's death on my mobile phone