शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
2
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
3
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
4
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
5
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
6
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
7
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
8
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
9
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
10
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
11
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
12
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
13
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
14
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
15
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
16
Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
18
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
19
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
20
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न

हैदराबाद एन्काऊंटर.. सोलापूरकरांचे पोलिसांना समर्थन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:04 IST

संतापाला मिळाली वाट; काहींना वाटले, कायद्याची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी होती

सोलापूर :  दिशावरील अत्याचार आणि तिच्या क्रूर हत्येतील आरोपींचे आज सकाळी पोलिसांनी एन्काऊंटर केले. चौकशीसाठी घटनास्थळी आणलेले चार आरोपी पोलिसांविरूद्धच आक्रमक होऊन पळ काढू लागल्यामुळे त्यांच्यावर गोळीबार करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेवर सोलापुरातील युवक, युवतींनी पोलिसांचे समर्थन करणारी भावना व्यक्त केली; तर काहीजणांनी कायद्याची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले.

हैदराबाद येथील एन्काऊंटरचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर ह्यलोकमतह्णने शहरातील युवा वर्गाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या एन्काऊंटरच्या निमित्ताने आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.  दिशा यांच्यावरील अत्याचार मानवतेला काळीमा फासणारा आहेच; पण या देशातील युवती, महिला सुरक्षित राहणार की नाहीत? असा प्रश्न उपस्थित करणारा आहे. पोलिसांनी ज्या परिस्थितीत चकमकीचे पाऊल उचलले. तीही बाजू समजावून घेतली पाहिजे; पण निष्पाप मुली आणि महिलांवर अत्याचार करणाºयांना कठोर शिक्षाच मिळायला हवी, अशाही भावना व्यक्त झाल्या.

एक नागरिक म्हणून मी हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करतो़ गुन्हा सिद्ध झाला होता़ २४ तासातच त्यांना फासावर लटकावले पाहिजे होते. उन्नावमधल्या आरोपीने जामिनावर असताना देखील पीडितेला जाळले, यावरून अपराध्याला कायद्याची आणि होणाºया शिक्षेची भीती राहिली नाही, असे वाटते़ - शरद वाले, शिक्षक, सोलापूर

कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अत्याचार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळालेला आहे़  हैदराबाद पोलिसांनी केलेले कृत्य हे काही लोकांना आवडले तर काही लोकांना आवडलेले नाही़ हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे स्वागत आणि अभिनंदऩ तसेच या पोलिसांच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले पाहिजे, त्यांनी जे केलंय ते योग्यच आहे. विशेष म्हणजे हैदराबाद पोलिसांना राष्ट्रपती पदक दिले पाहिजे़- सोमनाथ माने,सोलापूर

जनतेने पोलिसांच्या पाठीशी उभे राहावे. आरोपीस तत्काळ शिक्षा देण्यात यावी. म्हणजे महिलांविरोधात गुन्हे घडणार नाहीत. अशा बाबतीत मानव अधिकार पोलिसांच्या विरोधात असतो़ त्यांनी पण सत्य काय आहे, परिस्थिती काय आहे ती पहावी.- सारिका शिवमूर्ती कुंभार,पालक, सोलापूर

प्रथमत: हैदराबाद पोलिसांचे अभिनंदऩ आज त्या पीडित मुलीला खरा न्याय मिळाला आहे़ हैदराबादच्या पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे आता कोणताही नागरिक यापुढे असे कृत्य करणार नाही़ या कारवाईने देशातील अनेक मुली आनंदी झाल्या आहेत़ जर यापुढे देखील अशी वेळ आली तर पोलिसांनी अशी कामगिरी केली पाहिजे, सरकार व कोर्टाने याला पाठबळ द्यावे़-संघमित्रा अशोक वाघमारे, सोलापूर

नाही ही मुलगी, पत्नी, आई, आजी अशा विविध भूमिकेतून आपल्या कर्तव्याचा प्रकाश देत असताना अत्याचारासारखे ग्रहण लावून त्या प्रकाशाला संकुचित करणाºयांना योग्य तो धडा हैदराबाद पोलिसांनी दिला आहे़ ज्यामुळे पुढील पिढीकडून या आदिशक्तीचा सन्मान होईल़ पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वांनी कौतुक करून अभिनंदन केले पाहिजे़ सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे़विद्या सोमशेखर चिडगुंपी,सोलापूर

गेल्याच आठवड्यात संपूर्ण देशाला हादरून टाकणारी घटना आपण पाहिली़ त्यानंतर देशभरातून त्या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत होता़ अखेर न्याय प्रक्रियेत अडकून न राहता इतका लवकर न्याय मिळेल असे कोणालाही वाटले नव्हते. यापूर्वी घडलेल्या घटनातून अनेक आरोपींची सुटका झाली़ हैदराबाद घटनेतील आरोपींना तपासकामी अत्याचार केलेल्या ठिकाणी घेऊन पोलीस गेले त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करून पळून जाण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला़ जी शिक्षा त्यांना मिळाली ती योग्यच आहे़ या कारवाईचे अभिनंदन करतो़ देशातील प्रत्येक नागरिकांनी पोलिसांच्या पाठीशी उभे राहायला हवं़- दीपक डांगे, रहिवासी, जुळे सोलापूर

हैदराबाद घटनेतील पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे़ यापूर्वी झालेल्या घटनांतून जनतेच्या तीव्र भावना दिसत होत्या़ एका सुशिक्षित तरुणीवर अत्याचार करून तिला जिवे मारले़ ही घटना खूपच निंदनीय आहे़ अशा घटना वारंवार घडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. हैदराबादच्या पोलिसांनी आरोपींना अशा पद्धतीने शिक्षा दिली ती योग्यच आहे़ - गीतांजली भीमाशंकर बेलगोंडे,

रहिवासी, वामन नगर, सोलापूरहैदराबादमध्ये मागील आठवड्यात झालेले अत्याचार प्रकरण हे अतिशय निंदनीय आहे़ अत्याचार प्रकरणातील त्या चार नराधमांना हैदराबाद पोलिसांनी दिलेली शिक्षा योग्यच आहे़ पोलिसांवर हल्ला करून पळून जाणाºया आरोपींवर गोळ्या झाडल्या यात काही गैर नाही़ त्यामुळे देशातील सर्वांनी हैदराबाद पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे़ पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी आहेत त्यांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे़- तळवार सुरवसेशिक्षक, सोलापूर

हैदराबाद येथे तरुणीबाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या चार नराधमांना ठार करण्यात आले, परंतु अशा घटना घडू नये यासाठी देशामध्ये स्त्रियांच्या सुरक्षेकरिता कठोर कायदे करणे आवश्यक आहे. - सदाशिव विठ्ठल शिंदे,शिक्षक, सोलापूर

नुकत्याच हैदराबादमधील महिलेवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे़ असे कृत्य करणारे लोक म्हणजे मनुष्याच्या रुपात राक्षसच आहेत़ अशा नराधमांना भर चौकात ठेचून काढले पाहिजे़ तसेच मुलींना स्वरक्षणाबद्दल माहिती दिली पाहिजे़ ज्या नराधमांनी अत्याचार केला त्यांचा एन्काउंटर केल्याबद्दल हैदराबाद पोलिसांचे अभिनंदऩ- सुषमा अनिल नागटिळक,सोलापूर

मी एक भारत देशाची नागरिक व एक महिला आहे म्हणून प्रतिक्रिया देते़ हैदराबादमधील दुर्दैवी घटना ही त्या चार जणांनी जाणीवपूर्वक ठरवून केलेली घटना होती़ त्यामुळे त्या चारही आरोपींना तत्काळ शिक्षा देऊन पीडितेला न्याय देणे गरजेचे होते ते काम हैदराबाद पोलिसांनी केले आहे़ जनतेसाठी, महिलांसाठी कायदे का बदलू शकत नाही सरकाऱ कायदे आहेत पण ते संथगतीने न्याय देतात़ आजही दिल्लीतील निर्भयाला न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे़ कायद्याच्या दृष्टीने काय बरोबर काय चूक हे आता पाहणे गरजेचे नाही़ त्या पीडितेला न्याय मिळाला हे पुरे़ हैदराबाद पोलिसांचे अभिनंदऩ- उज्ज्वला साळुंखे,

मुख्याध्यापक, सुरवसे हायस्कूल, सोलापूरअत्याचार करणाºयाला फाशीची शिक्षा अथवा गोळी झाडावी़ यासाठी पोलिसांना कायद्यात सूट द्यावी़ हैदराबादेतील पीडितेवर अत्याचार करणाºया त्या चार नराधमांना पोलिसांनी गोळ्या घातल्या, त्यामुळे तिला न्याय मिळाला़ अशा प्रकारची शिक्षा दिल्याने अत्याचार करणारा शंभरवेळा विचार करेल़ - सुहास छंचुरे, क्रीडाशिक्षक, सोलापूर

महिलांवर होणाºया अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ देशातील महिला व मुली असुरक्षित असल्याची भीती जाणवत आहे़ अशा परिस्थितीत हैदराबादेतील पीडितेवर अत्याचार करणाºया त्या चार नराधमांना पोलिसांनी गोळ्या झाडल्या़ आणि अत्याचार करणाºयांना एक धडा दिला़ नक्कीच हैदराबाद पोलिसांनी केलेली कार्यवाही कौतुकास्पद आहे़-दशरथ गुरवसोलापूर

गुन्हा हा गुन्हाच असतो़ त्याचे कोणीही समर्थन करू नये़ एखाद्या अत्याचार केलेल्या व्यक्तीची पाठराखण केली आणि तो न्यायालयातून अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष सुटला तर आणखी त्याला अत्याचार करण्यास फूस मिळते़ अशा प्रकारे अत्याचार करणाºयांना वेळीच गोळ्या घातल्या पाहिजेत़ जेणेकरून त्यांना भीती बसेल़ हैदराबाद पोलिसांनी त्या  चौघा नराधमांवर केलेली कारवाई योग्यच आहे़- राजेंद्र मानेसोलापूरहैदराबाद पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे समाजात अत्याचार करणाºयांना एक धडाच आहे़ अशा प्रकारच्या कारवाईने अत्याचार करणाºयांमध्ये नक्कीच परिवर्तन होईल़ कोणीही अत्याचार करणार नाही़ अत्याचार, अन्याय थांबतील़ शासनानेदेखील याविषयीच्या कायद्यात बदल करावेत़ पोलीस प्रशासनाला पूर्ण अधिकार द्यावेत़ जेणेकरून अशा प्रकारच्या घटनेनंतर कारवाई करण्यासाठी त्यांना  मुभा मिळेल़-अजित पाटीलसोलापूरहैदराबादेतील घटना यापुढे घडू नयेत़ अशाप्रकारच्या घटनेने मन सुन्न झाले़ मात्र हैदराबाद पोलिसांनी त्या आरोपींना थेट गोळ्या घालून त्या पीडितेला एकप्रकारे न्यायच मिळवून दिला असेच म्हणावे लागेल़ अशा अनेक प्रकारच्या घटना घडतात़ त्या सर्व पीडितांनादेखील न्याय मिळायला पाहिजे़-विठ्ठल कुंभारही संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे़ लोकांचा न्यायालयावर विश्वास उरला नाही़ लवकर न्याय मिळणार नाही किंवा मिळणारच नाही, ही भावना जनतेमध्ये रुजायला लागली की मग अशा एक्स्ट्रा ज्युडीशियल किलिंगला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळतो.या सर्व प्रकाराला वकील, न्यायाधीश यापेक्षा पुरेशा प्रमाणात न्यायालयीन पायाभूत सुविधा पुरवू न शकणारे सरकारपण जबाबदार आहे. अशा एन्काउंटरला लोकसमर्थन मिळाले की पोलीस यंत्रणा अनिर्बंधपणे वागू लागते़यातून मेडल मिळविण्याच्या नादात निष्पाप लोकांचे एन्काउंटर केले जातात. न्यायव्यवस्थेलाच वेकअप कॉल आहे.- सुमित चव्हाण, सोलापूऱहैदराबादमधील    पोलिसांनी जे काही केले ते योग्यच आहे़    अशा प्रकारे अत्याचार करणाºयांना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा गोळी घालावी. दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार होताना हा समाज का गप्प बसतोय़ देशातील कायदे कडक असतानाही या अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होत आहे़पोलिसांना अशा प्रकारच्या घटनेवर कारवाईसाठी मुभा द्यावी.- शैला स्वामी, माजी नगरसेविका़, सोलापूर

हैदराबाद येथील महिलेवर झालेला अत्याचार हा निंदनीय होता़ त्यानंतर देशभरात उसळलेल्या लाटेमुळे त्या पीडितेला न्याय लवकर मिळावा अशी मागणी होत असतानाच हैदराबाद येथील पोलिसांनी एन्काउंटर करून मारले़ त्यामुळे खºया अर्थाने त्या पीडितेला लवकर न्याय मिळाला़ ही पोलिसांनी केलेली कारवाई नक्कीच योग्य म्हणायला हवी़ महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी देशात कडक कायदे व्हायला हवेत़- अक्षय बंडू पवार, पार्क चौक—————————हैदराबादमधील पीडित महिलेला खºया अर्थाने जलद  न्याय मिळाला़ महिलांवर वाढते अत्याचार, विनयभंगासारख्या घटनांमध्ये नियमित वाढ होत आहे़ शासनाने महिलांसाठी नवे कडक कायदे करावेत. हैदराबाद पोलिसांनी केलेली कारवाई खरंच कौतुकास्पद असून पोलिसांच्या पाठीशी सरकारनं उभं रहावं़ यापुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवे़ -सुमित चंदू चव्हाणसोलापूर—————————- 

टॅग्स :Solapurसोलापूरhyderabad caseहैदराबाद प्रकरणRapeबलात्कारPoliceपोलिस