पाचजणांच्या मारहाणीत पती-पत्नी, मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST2021-03-21T04:21:51+5:302021-03-21T04:21:51+5:30

एकनाथ ज्ञानू गडदे व चिंगाबाई एकनाथ गडदे, किरण एकनाथ गडदे अशी जखमींची नावे आहेत. एकनाथ ज्ञानू गडदे यांनी शनिवारी ...

Husband, wife, son injured in beating of five | पाचजणांच्या मारहाणीत पती-पत्नी, मुलगा जखमी

पाचजणांच्या मारहाणीत पती-पत्नी, मुलगा जखमी

एकनाथ ज्ञानू गडदे व चिंगाबाई एकनाथ गडदे, किरण एकनाथ गडदे अशी जखमींची नावे आहेत. एकनाथ ज्ञानू गडदे यांनी शनिवारी स. ७.३० च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या सुरेखा सुरेश गडदे, बाळाबाई विलास गडदे, सुरेश महादेव गडदे, विलास महादेव गडदे, ताई महादेव गडदे यांना तुमच्या कोंबड्या आमच्या बागेत कशाला सोडता, असे विचारले. यावेळी त्यांनी कोंबड्या येणारच, तुमचे असे काय नुकसान होते, असे म्हणून पत्नी चिंगाबाई हिला मारहाण सुरू केली. त्यावेळी पती एकनाथ सोडविण्यास गेले असता त्यांनाही शिवीगाळी केली. यावेळी मुलगा किरण हाही भांडण सोडवण्यास आला. यावेळी विलास महादेव गडदे यांनी लोखंडी पाइपने एकनाथ गडदे यांच्या डाव्या खांद्यावर व डोक्यात मारून जखमी केले. सुरेश गडदे यांनी त्याच्या हातातील काठीने त्यांच्या पाठीवर तसेच मुलगा किरण याच्या उजव्या हातावर, मनगटावर, अंगठ्यावर मारून जखमी केले. ताई गडदे हिने पत्नी चिंगाबाई हिला हाताने मारहाण केली. याबाबत एकनाथ ज्ञानू गडदे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Husband, wife, son injured in beating of five