पत्नीला आणायला गेलेल्या पतीला साडूने चोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:20 IST2021-04-12T04:20:50+5:302021-04-12T04:20:50+5:30
: साडूच्या घरातून पत्नीला आणायला गेलेल्या पतीला त्याने मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजता घडली. यावेळी पत्नीनेही ...

पत्नीला आणायला गेलेल्या पतीला साडूने चोपले
: साडूच्या घरातून पत्नीला आणायला गेलेल्या पतीला त्याने मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजता घडली. यावेळी पत्नीनेही पतीला शिवीगाळ केली. त्यामुळे कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान तुकाराम बागल (रा बागल वस्ती, भोसरे ता माढा) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या दोन दिवसांंपासून पत्नी प्रीती समाधान बागल ही साडू दत्तात्रय शिवाजी बागल (रा. बागल वस्ती, भोसरे ता माढा) यांच्याकडे गेली होती. शनिवारी रात्री ८ वाजता तिला आणण्यासाठी समाधान बागल हा साडूच्या घरी गेला. आपल्या घराकडे चल म्हणून तिची वाट पाहत रोडवर थांबला. यावेळी काही वेळाने साडू त्यांच्या घराबाहेर आले व तू इथून निघून जा, म्हणून शिवीगाळ करू लागले. जवळच पडलेल्या खोऱ्याच्या दांड्याने त्याच्या डाव्या हातावर व पायावर मारहाण करीत जखमी केले. यावेळी पत्नी प्रीती हिनेही साडूला साथ देत शिवीगाळ केली म्हणून या दोघांच्या विरोधात कुर्डूवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे करीत आहेत.