शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पत्नी देवाघरी गेली हे पतीला कळालेच नाही; तो दोन दिवस मृत पत्नीशी करत होता संवाद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 12:14 IST

कोरोना संकट : मुलगा अंत्ययात्रेलाही पोहचू शकला नाही...

ठळक मुद्देसोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरातील घटनाया घटनेची माहिती मिळतात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखलया घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली हळहळ

रुपेश हेळवे

सोलापूर : जुळे सोलापूरात एक वयोवृध्द जोडपे राहत होते. पत्नीही गेल्या अनेक वर्षापासून आजारी होती, तर पतीचे वय ही जवळपास ७८ वर्षे होते. त्यांना दोन मुले आहेत. ते दोन्ही मुले हे लॉकडाऊनमुळे सोलापूरच्या बाहेर अडकले होते. दरम्यान, दोन दिवसापुर्वी पत्नीचा जीव गेला, पण हे वयोवृध्द पतीला कळालेच नाही. तो आपल्या पत्नीकडे जाऊन म्हणत होता तुला बरं वाटत नसेल तर तु झोप, आराम कर... जेव्हा परिसरात दुर्गंधी पसरली तेव्हा शेजाºयांनी पोलीसांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली, पण लॉकडाऊनमुळे अडकलेला एक मुलगा आईच्या अंत्ययात्रेलाही येऊ शकला नाही.

जुळे सोलापूरात एक ६३ वर्षाची महिला आणि ७८ वर्षाचे पुरूष असे जोडपे राहत होते, महिला ही गेल्या अनेक दिवसापासून आजारी होती, तर पतीचे वय झाल्यामुळे त्यांना दिसण्याबरोबरच ऐकण्याची, वास घेण्याची क्षमता ही कमी झाले होते, त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा मुंबईमध्ये वकीली व्यवसाय करतो तर दुसरा मुलगा सोलापूरात व्यवसाय करत दुसºया ठिकाणी राहत आहे.पण दोन्ही मुले हे आपल्या आई वडीलांची नेहमी काळजी करत असत. आईवडीलांच्या सेवेसाठी एक महिला होती. बुधवार १५ एप्रिल रोजी ही घरकाम करणारी महिला पुढील दोन दिवस कामासाठी येणार नाही असे सांगून तिने सुट्टी घेतली, त्यानंतर ती महिला कामासाठी आलीच नाही, याच दरम्यान (बुधवारी सायंकाळी किंवा गुरूवारी) आजारी असलेली महिला ही बेडवरून खाली पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला. पण पती हे वयोवृध्द असल्यामुळे आपली पत्नी खाली पडली. त्यात ती जखमी झाली. हे पतीला कळालेच नाही. ते पत्नीच्या रुम मध्ये गेल्यावर पत्नीला म्हणत, तुला बरं वाटतं नाहीय का , मी मुलाला सांगितले आहे. तो डॉक्टरांना पाठवून देईल. तुला लगेच बरे वाटेल़ असे म्हणून जात होते, अशी माहिती पोलीसांनी दिली, आपल्या पत्नीचा मृत्यू होऊन एक-दोन दिवस झाले आहे हे त्यांना कळलेच नाही.पण एक-दोन दिवस झाल्यानंतर म्हणजेच गुरूवार सायंकाळपासूनच परीसरात दुर्गंधी पसरली. यामुळे परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांना परिसरात दुर्गंधी पसरल्याची माहिती दिली. तेव्हा जुळे सोलापूर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी प्रकाश पवार, कपिल जवळे, मिथुन चव्हाण हे घटनास्थळी पोहचले, आणि घरात जाऊन पाहिले असता ही घटना उजेडात आली.तेव्हा पोलिसांनी दोन्ही मुलांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. पण लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले मुलांना सोलापुरात येता येईना. कसेबसे प्रयत्न करून एक मुलगा सोलापुरात दाखल झाला. दुसरा मुलगा परवानगी घेऊन दुचाकीवरून सोलापूर गाठले. पण त्याला सोलापूरला येण्यासाठी शुक्रवारी रात्री उशीर होणार होता, यामुळे मुलाने आपल्या काळजावर दगड ठेवत आईच्या अंत्यविधी उरकण्यास आपल्या भावाला सांगितले. भावाने सांंगितल्याप्रमाणे आईचा अंत्यविधी एकाच मुलाच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी रात्री करण्यात आले. ही घटना जेव्हा परिसरात कळली तेव्हा नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होते.---------------------------------मुले दिवसातुन चार वेळा करत होते फोन.आपले आईवडील एकटेच आहेत. यामुळे त्यांच्या काळजीसाठी मुलांनी महिला कर्मचारी नेमले होते. ती महिला दररोज येऊन काम करत होते, याच बरोबर आईवडीलांची विचार पुस करण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन आरोग्याच्या तपासणीसाठी डॉक्टरांची ही वेळोवेळी पाठवत होते़ याच बरोबर दिवसातुन ते चार वेळा फोन करत आई वडीलांची विचारपुस करत होते़ अशी माहिती पोलीसांनी दिली.

--------------------------------आपल्या आईचा मृत्यू झाला आहे हे मुलांना कळताच त्यांना धक्का बसला. ते कसेबसे करून सोलापूर येण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. पोलीसांची परवानगी मिळाली. पण येताना प्रत्येक ठिकाणी त्यांची विचारपुस होत होती़ सोलापुरात आल्यानंतर त्यांची कोरोना बाबतची तपासणी करण्यात आली. आणि त्यांना घरी सोडण्यात आले. सोलापूरात दाखल होईपर्यंत ४ ठिकाणी त्यांना तपासणी करण्यात आले.

-------------------------------घडलेली घटना पोलीसांना सांगितले, त्यामुळे पोलीस प्रशासनाचा ही मदत झाली. पण सोलापूरला येण्यासाठी उशीर झाल्यामुळे मला आईच्या अंत्यविधी मिळाली नाही. वडीलांना धक्का बसेल म्हणून अजूनही वडीलांना आई गेल्याचे सांगितले नाही.मयताचा मुलगा

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू