शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याचा संशय घेऊन पतीने केला पत्नीवर चाकूने हल्ला; पतीनेही केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 10:51 IST

मुस्ती येथील घटना: पतीवर गुन्हा दाखल

सोलापूर : चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीच्या पोटात जिवे मारण्याच्या हेतूने चाकूने वार केल्याची घटना गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास मुस्ती (ता. द. सोलापूर) येथे घडली.

काजल धनराज भालेराव (वय २४, रा. पांढरी. ता. लोहारा, जि. उस्मानाबाद, सध्या - मुस्ती, ता.द.सोलापूर) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून धनराज मधुकर भालेराव (वय ३०, रा. पांढरी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) याच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काजल यांचा धनराज याच्या बरोबर विवाह झाला हाेता. विवाहानंतर धनराज याने पत्नी काजलवर चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण केली. त्यामुळे काजल ही मागील चार वर्षांपासून माहेरी (रा. मुस्ती) येथे राहत होती.

मंगळवार १९ ऑक्टोबर २०२१रोजी नवरा धनराज हा मुस्ती येथे आला. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे काजलजवळ येऊन तू माझी नाही तर कुणाची नाही असे मोठ्याने ओरडल्याने काजल ही भीतीने घाबरून जागी झाली. याचवेळी पती धनराज याने त्याच्या जवळील चाकूने काजलच्या पोटात जिवे मारण्याच्या हेतूने वार करून गंभीर जखमी केले. याचवेळी काजलने चाकूचा दुसरा वार हाताने अडविला त्यावेळी काजलच्या दोन्ही हाताला मोठी जखम झाली. या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पती धनराज विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करीत आहेत.

--------

पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न...

या घटनेनंतर पती धनराज भालेराव याने स्वत: पोटात त्याच चाकूने भोसकून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची नोंद वळसंग पोलिसात झाली आहे. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश शामराव माने यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस