तेरा जणांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST2021-02-05T06:43:46+5:302021-02-05T06:43:46+5:30
या भांडणात भास्कर घाडगे यांच्या गळ्यातील बदाम तर पत्नीच्या कानातील सोन्याची कर्णफुले, साखळी पडून गहाळ झाले. भास्कर घाडगे यांनी ...

तेरा जणांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
या भांडणात भास्कर घाडगे यांच्या गळ्यातील बदाम तर पत्नीच्या कानातील सोन्याची कर्णफुले, साखळी पडून गहाळ झाले.
भास्कर घाडगे यांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. यावरून पोलिसांनी तानाजी शिवाजी बुधावले, दादा मारुती चव्हाण, अमोल जनार्दन चव्हाण, भैया जनार्दन चव्हाण, जगन्नाथ कृष्णा चव्हाण, नानासो तातोबा चव्हाण, श्रावण निवृत्ती बुधावले, उमाजी पांडुरंग चव्हाण, बबाताई नवनाथ चव्हाण, तायडा जनार्दन चव्हाण, सोना दादासो चव्हाण, नंदाबाई जगन्नाथ चव्हाण, तानाजीचा मेव्हणा (रा. पुळुज, ता. पंढरपूर) या १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
२५ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास वाकी शिवणे (ता. सांगोला) येथील भास्कर घाडगे आणि दादा चव्हाण यांच्यात सामाईक बांधावरून वाद झाला होता. दरम्यान, २६ जानेवारी रोजी स. १० च्या सुमारास भास्कर घाडगे हे घरासमोर बसले असताना तानाजी बुधावले, दादा चव्हाण, अमोल चव्हाण, भैया चव्हाण यांनी घरातून बोलावून घेत मारहाण करीत सामाईक बांधावर घेऊन गेले. त्या ठिकाणी बांधावर जगन्नाथ चव्हाण, नानासो चव्हाण, श्रावण बुधावले, उमाजी चव्हाण व तानाजी याचा मेव्हणा असे सर्व जण मिळून भास्कर घाडगे यास काठी व एसटीपीच्या पाइपने मारहाण करू लागले म्हणून पत्नी अश्विनी भांडण सोडवण्याकरिता मध्ये आली असता तिला बबाताई चव्हाण, तायडा चव्हाण, सोना चव्हाण, नंदाबाई चव्हाण यांनी हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली.