भावकीतील सहा जणांची पती-पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:21 IST2021-05-22T04:21:17+5:302021-05-22T04:21:17+5:30

सारिका करांडे व आनंदराव करांडे असे जखमी पती-पत्नीचे नाव आहे. बुद्धेहाळ येथील सारिका आनंदराव करांडे यांचा ५ वर्षीय अल्पवयीन ...

Husband and wife of six brothers beaten | भावकीतील सहा जणांची पती-पत्नीला मारहाण

भावकीतील सहा जणांची पती-पत्नीला मारहाण

सारिका करांडे व आनंदराव करांडे असे जखमी पती-पत्नीचे नाव आहे.

बुद्धेहाळ येथील सारिका आनंदराव करांडे यांचा ५ वर्षीय अल्पवयीन मुलगा शंभूनाथ हा गुरुवारी त्यांच्या घराजवळील रस्त्याजवळ शौचास बसला होता. यावेळी यशवंत करांडे व उषाबाई करांडे या दोघांनी मुलास येथे शौचास का बसला असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली होती. याबाबत करांडे पती-पत्नीने दोघांविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्याच दिवशी सायं. ५ च्या सुमारास सारिका व आनंदराव करांडे पती-पत्नी घरात बसले असताना संतोष पांडुरंग करांडे, यशवंत पांडुरंग करांडे, पांडुरंग किसना करांडे, रूपाली संतोष करांडे, लखन गोरख करांडे हे त्यांच्या घरात घुसले आणि तुम्हा दोघांना जास्त मस्ती आली आहे, तुम्ही सारख्या केसेस करायला जाता, तुम्हाला आता सोडत नाही, जीवे मारतो, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करू लागले.

यावेळी उषाबाई करांडे व रूपाली करांडे या दोघींनी सारिकाचे केस धरून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. त्यावेळी पती आनंदराव हे घरातून बाहेर पाठीमागे गेले असता संतोष करांडे, यशवंत करांडे, पांडुरंग करांडे, लखन करांडे या चौघांनी केबल, चैन, दगड, काठीने त्यास मारहाण केल्यामुळे नाकातून रक्त येऊ लागले. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून सचिन लवटे यांनी त्यांची भांडणे सोडवासोडवी केली. जखमी आनंदराव करांडे यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत सारिका करांडे यांनी फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Husband and wife of six brothers beaten