शिकारी जिवंत काळवीट घेऊन निघाले; पोलिसांना पाहताच दुचाकी सोडून पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:28 IST2021-09-07T04:28:02+5:302021-09-07T04:28:02+5:30

कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार बबलू नाईकवाडी, ...

The hunters took the live antelope; When he saw the police, he left his bike and fled | शिकारी जिवंत काळवीट घेऊन निघाले; पोलिसांना पाहताच दुचाकी सोडून पळाले

शिकारी जिवंत काळवीट घेऊन निघाले; पोलिसांना पाहताच दुचाकी सोडून पळाले

कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार बबलू नाईकवाडी, महादेव पवार, वाहनचालक चंद्रकांत चव्हाण, पोलीस शिपाई राहुल दोरकर, होमगार्ड श्रीमंत क्षीरसागर यांना लागलीच दादापूर शिवारात पाठवण्यात आले. पोलिसांना लाल दुचाकीवर काळवीट जातीचे हरीण घेऊन दोघेजण जात होते. रस्त्यावर पोलिसांचे वाहन पाहून दोघे शिकारी यांनी काळवीट व मोटार सायकल क्रमांक एमएच १३, डीआर ६३४८ ही जागेवर सोडून पळून गेले. पोलिसांनी काळवीट ताब्यात घेतले असून, पुढे हे हरीण वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे, वनरक्षक सुनील थोरात, वनसेवक लालू पवार, वनपरिमंडल अधिकारी सुनील साळुंखे, वन सहासहायक संभाजी अवताडे, गोपाळ पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. कामती पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

...........

काळवीट घेऊन जाणारे आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचा पोलिसांची दोन पथके शोध घेत आहेत. लवकरात लवकर संशयितांना ताब्यात घेतले जाईल.

-अंकुश माने, सहायक पोलीस निरीक्षक, कामती

Web Title: The hunters took the live antelope; When he saw the police, he left his bike and fled