शंभर नागरिकांनी बदलले पारंपरिक व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:21 IST2021-04-18T04:21:10+5:302021-04-18T04:21:10+5:30
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे किराणा, भाजीपाला, दूध डेअरी, बेकरी, खाद्यपदार्थ, कृषी दुकाने, हॉटेल यांना ...

शंभर नागरिकांनी बदलले पारंपरिक व्यवसाय
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे किराणा, भाजीपाला, दूध डेअरी, बेकरी, खाद्यपदार्थ, कृषी दुकाने, हॉटेल यांना अत्यावश्यक सेवा म्हणून संचारबंदीमधून वगळण्यात आले आहे. ज्या ज्या व्यावसायिकांना दुकाने बंद करावी लागली आहे अशानी आपले दैनंदिन अडचणी पाहून ते भागवण्यासाठी तर काहींनी पैशाच्या हव्यासापोटी मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेले व्यवसाय बदलले आहेत. गेल्या काही दिवसात इलेक्ट्रॉनिक, मोबाईल, नारळ, चहा कँटिंग असे अनेक वर्षांपासून सुरू असलेले व्यवसाय कोरोनामुळे बंद करावे लागले. त्या ठिकाणी नव्याने फिरता चहा, वडापाव सेंटर, किराणा दुकान, दुधाची डेअरी, भाजीपाला, फळविक्री अशा प्रकारचे नव्याने व्यवसाय सुरु केले आहेत. त्याला संचारबंदीत परवानगी मिळाली आहे. यातून चार पैशातून कुटुंबाची गुजराण सुरू आहे. काहींनी घरोघरी फिरून भाजीपाला तर काहींनी दूध विक्री सुरू केली.