शेलेवाडी परिसरात मानवी सांगाडा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST2021-07-07T04:28:15+5:302021-07-07T04:28:15+5:30

शेेलेवाडी शिवारातील गट नं. ३०२ हा गुंडा श्रीमंत चव्हाण यांच्या मालकीचा असून, या गटामध्ये मानवी शरीराचा सांगाडा ४ जुलै ...

A human skeleton was found in Shelewadi area | शेलेवाडी परिसरात मानवी सांगाडा सापडला

शेलेवाडी परिसरात मानवी सांगाडा सापडला

शेेलेवाडी शिवारातील गट नं. ३०२ हा गुंडा श्रीमंत चव्हाण यांच्या मालकीचा असून, या गटामध्ये मानवी शरीराचा सांगाडा ४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता सापडला होता. याची खबर विकास गुंडा चव्हाण यांनी पोलिसांत दिली होती. चामडेविरहित निव्वळ हाडाचा सांगाडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे याची ओळख पटणे अशक्य झाले असल्याने ती हाडे ताब्यात घेतली आहेत. डी.एन.ए. चाचणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

दीड वर्षापूर्वी असाच एक सांगाडा यापूर्वी मिळून आला होता. यात पोलिसांना छडा लावण्यात यश आले होते. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्यासोबत डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, तपास अधिकारी सत्यजित आवटे, सहायक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे, आदी उपस्थित होते.

Web Title: A human skeleton was found in Shelewadi area