शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

घरचे कर्ते पुरुष अडीच महिने किचन रूममध्ये रमले; आता भांड्यांच्या खरेदीसाठी स्वत:च दुकानात शिरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:02 IST

लॉकडाऊननंतरचं बदलतं सोलापूर; स्वयंपाक घरातील अडचणी आल्या लक्षात; रोटी मेकर, वेट मॉप अन् ड्राय मॉपची विक्री सर्वाधिक

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : एखाद्या नैसर्गिक संकटाचा, महामारीचा परिणाम चांगलाही असू शकतो याची अनुभूती कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सोलापूरकरांनी प्रथमच घेतली़ उद्योग, कारखाने बंद काळात अनेक  पुरुष चक्क स्वयंपाक घरात रमले़  पिझ्झा ते बटाटा वडे बनवायला शिकले़ कुटुंबाशी एकरुप होताच स्वयंपाक बनवताना गृहिणींपुढील समस्या जाणवल्या़ आता आपल्या कुटुंबासोबत घरगुती साधनांच्या खरेदीसाठी पुरुष मंडळींनीही घरच्यांसोबत बाजारात गर्दी केली.

संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले़ या काळात बहुतांश ठिकाणी पुरुष वर्ग कामावर नव्हता़ या काळात घरेलू कामगार महिलादेखील बाहेर पडू शकल्या नाहीत़ मात्र रिकाम्या वेळेत पुरुष मंडळी कुटुंबात रमली़ बघता-बघता त्यांचे पाय स्वयंपाक घराकडे वळले़ गृहिणीला मदत करता-करता स्वयंपाक बनवायला शिकले.

७५ दिवसांच्या संचारबंदीत पुरुषवर्ग गृहिणीसोबत इतका रमला की तो यू ट्यूबवरच्याही रेसिपी बनवून शेजाºयांशी स्पर्धा चालवली़ काहींनी घरातील स्वच्छता, काहींनी कपडे इस्त्री तर काहींनी कपडे  धुण्याचे धडे गिरवले़ काही  मंडळींनी चक्क भांडी धुण्याचेही  धडे गिरवले. मात्र, या काळात स्वयंपाक घरात काम करताना स्त्रियांपुढे कोणते प्रश्न येतात, त्या सोडवण्यासाठीची कसरत, स्वयंपाक घरातील गरजा पुरुष मंडळींनी अनुभवल्या. एखादा पदार्थ खाऊन कंटाळा आला म्हणणारे पुरुष आता घरातल्या स्त्रीला खºया अर्थाने समजून घेतले़ लॉकडाऊन शिथिल होताच बाजारपेठ सुरू झाली आणि भांड्यांच्या खरेदीसाठी स्त्रियांबरोबर पुरुषांनीही गर्दी केली.

यू ट्यूबवरची रेसिपी बनवा अन् टाका स्टेटसला - गृहिणीसोबत पाककृती शिकता शिकता काही पुरुष मंडळींनी एक पाऊल पुढे टाकत यू ट्यूबवर पाहून रेसिपी बनवली़ ही पाककृती व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवून स्पर्धा चालवली़ काहींनी चक्क आवडत्या पदार्थाची तयारी वहीमध्ये लिहून काढली़ अगदी मीठ, हळद, मिरची यांचे प्रमाण नोंदवले़ 

भांडी खरेदीकडे कल- लॉकडाऊन शिथिल होताच सर्वात आधी शहरातील भांडी दुकानात गर्दी झाली़ गॅस शेगड्या, वॉटर फिल्टर, मायक्र ो ओव्हन, ओटीजी (ओव्हन टोस्टर ग्रीलर), इलेक्ट्री के टल, केक बीटर, मिक्सर या वस्तूंच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळतोय़ याशिवाय रोटी मेकर आणि फरशी पुसण्यासाठी लागणारे वेट मॉप आणि ड्राय मॉप खरेदीवर भर राहिला़ 

लॉकडाऊनमुळे पत्नी बाहेर गावी अडकली़ ती घरी येऊ शकली नाही़ मात्र घरातील सदस्यांच्या माध्यमातून मसाला भात, गुलाब जामून, उत्तप्पा, द्वाशी बनवायला शिकलो़ विशेषत: कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेला पदार्थ ‘कोल्हापुरी गोंडा’ बनवायला शिकल्याचे समाधान वाटते़ याही पुढे असे पदार्थ मुलांना खाऊ घालण्यात वेगळा आनंद मिळतो.

- विद्यानंद अंकद 

मासिक उत्पन्नाबाबत लॉकडाऊनमुळे पोळले असलो तरी स्वयंभू होण्याच्या दृष्टीने काही शिकताही आले़ पत्नीच्या मदतीने पनीर टिका, बटाटा वडे, वरण भाताचे धडे गिरवले़ भविष्यात नोकरीनिमित्त बाहेर पडलो तर पोटाची आबाळ होणार नाही़ स्वयंभू होऊ़ - विनायक सलगर 

लॉकडाऊनने पाक कृती शिकवली़ घरच्यांच्या मदतीने बटाटा वडे, मेदू वडे, भजी, पालक पनीर बनवायला शिकता आले़ हे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी घरगुती साधने खरेदीचाही आनंद आज घेता आला़ यामुळे स्वयंपाक घरातील नेमक्या समस्या समजल्या़ - सुधाकर पांढरे 

संचारबंदीने हाताला चांगली सवय लावली़ आई आणि बहिणींच्या माध्यमातून ./पिझ्झा, बर्गर आणि भाकरी-चपातीही शिकता आली़ पाककृतीतले मर्म जाणून घेता आले़ खरेतर असे धडे मुलांना लहान वयातच द्यायला हवे होते़ ते आता मिळताहेत़ - किरण पवार

 लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे नुकसान झाले, मात्र या दोन दिवसात घरगुती साहित्य खरेदीकडे गृहिणींबरोबर पुरुष वर्गाचा कल वाढला, त्याला स्वयंपाक घरातील खºया समस्या कळाल्या आहेत. हाच पुरुष आता घरगुती साधने दुरुस्त करण्याऐवजी नवीन खरेदी करतोय़ - खुशाल देढिया, सर्वोदय भांडार  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHome Applianceहोम अप्लायंस