शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Good News; सोलापूर-पुणे महामार्गावर एका तासाला एक शिवशाही गाडी धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:09 IST

सोलापूर आगारात नवीन अकरा बस दाखल; प्रवाशांना होणार फायदा

ठळक मुद्देगेल्या चार ते पाच महिन्यांपासून सोलापूर आगारातील पुणे महामार्गावरील शिवशाही गाड्यांच्या फेºया विस्कळीत झाल्या होत्याकाही दिवसांपूर्वी सोलापूर आगारात नवीन अकरा शिवशाही गाड्यांचा समावेश झाला आहेपुण्यासाठी पहाटे ५ वाजल्यापासून मध्यरात्री १२ पर्यंत प्रत्येक एका तासासाठी एक शिवशाही गाडी पुण्यासाठी धावणार आहे

सोलापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून विस्कळीत झालेल्या पुणे महामार्गावरील शिवशाही गाड्यांच्या फेºया आता पूर्वपदावर येत आहेत़  सोलापूर आगारात ११ नवीन शिवशाही गाड्यांचा समावेश झाला आहे़ यामुळे सोलापूर आगारातून पुण्यासाठी प्रत्येक तासाला एक गाडी सुरू होणार आहे़ यामुळे याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सोलापूर आगारातील पुणे महामार्गावरील शिवशाही गाड्यांच्या फेºया विस्कळीत झाल्या होत्या यामुळे अनेक प्रवाशांना नाईलाजाने खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागत होता़ पण काही दिवसांपूर्वी सोलापूर आगारात नवीन अकरा शिवशाही गाड्यांचा समावेश झाला आहे़ यामुळे आता पुण्यासाठी पहाटे ५ वाजल्यापासून मध्यरात्री १२ पर्यंत प्रत्येक एका तासासाठी एक शिवशाही गाडी पुण्यासाठी धावणार आहे़ तर पुण्याहून सोलापूरला येण्यासाठी पहाटे ५.३० ते रात्री १२. ३० पर्यंत प्रत्येक तासाला एक गाडी असणार आहे.

एसटीच्या स्वमालकीच्या नवीन शिवशाही गाड्या दाखल झाल्यामुळे सोलापूर आगारातील शिवशाही गाड्यांचा आकडा १९ वर पोहोचला आहे़ सोलापूर आगारात आतापर्यंत पुणे महामार्गावर ८ गाड्यांच्या माध्यमातून दिवसातून १८ फेºया केल्या जात होत्या; पण आता गाड्यांची संख्या वाढल्यामुळे आता दिवसाकाठी २१ फेºयांचे नियोजन करण्यात आले आहे़ सोलापूर आगारात सामील झालेल्या सर्व गाड्या या एसटीच्या स्वमालकीच्या आहेत़ चार-पाच महिन्यांपूर्वी सोलापूर आगारातील खासगी जवळपास १५ शिवशाही गाड्या या अचानक बाहेर पाठवण्यात आल्या होत्या़ यामुळे पुणे महामार्गावरील शिवशाही गाड्यांच्या फेºया विस्कळीत झाल्या होत्या.

मोबाईल अ‍ॅपवर सुविधा- सोलापूर आगारातील शिवशाहीची संख्या कमी झाल्यामुळे आॅनलाईनवर शिवशाही गाड्यांचे आरक्षण करण्यात येत नव्हते़ पण आता सर्व फेºया पूर्वपदावर येत असल्यामुळे आता पुन्हा सर्व गाड्या आॅनलाईनवर आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहेत़ याचबरोबर मोबाईल अ‍ॅपवरही आरक्षण सुविधा थोड्याच दिवसात सुरू करण्यात येणार आहे़ 

सोलापूर आगारातून पुण्यासाठी जाणाºया प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाला शिवशाही गाड्यांची मागणी करण्यात आली होती़ यानुसार आता सोलापूर आगारात ११ नवीन शिवशाही गाड्या नुकत्याच दाखल झाल्या आहेत यामुळे सोलापूर-पुणे महामार्गावर प्रत्येक तासाला एक गाडी सोडण्यात येत आहे़ -दत्तात्रय कुलकर्णी,आगार व्यवस्थापक, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरShivshahiशिवशाहीBus DriverबसचालकPuneपुणे