कारच्या धडकेने हॉटेल व्यावसायिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:26 IST2021-08-28T04:26:45+5:302021-08-28T04:26:45+5:30

भीमानगर : भरधाव वेगात निघालेल्या कारची जोरात धडक बसून भीमानगर येथील एक हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी होऊन मरण पावला. ...

Hotelier killed in car crash | कारच्या धडकेने हॉटेल व्यावसायिक ठार

कारच्या धडकेने हॉटेल व्यावसायिक ठार

भीमानगर : भरधाव वेगात निघालेल्या कारची जोरात धडक बसून भीमानगर येथील एक हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी होऊन मरण पावला. जितेंद्र उद्धव जाधव (४२) असे अपघातात जखमी होऊन मरण पावलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून, शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता भीमानगर येथे हॉटेल गारवासमोर हा अपघात झाला.

जितेंद्र जाधव हे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभाग ऊस पुरवठादार आहेत. ते शुक्रवारी भीमानगर येथील हॉटेलवर थांबले होते. काही वेळाने ते रस्त्याच्या कडेला येऊन थांबले होते आणि इतक्यात पुण्याहून सोलापूरकडे भरधाव वेगात निघालेल्या कारची (एमएच १४ जेएल १५६४) जितेंद्र जाधव यांना जोरात धडक बसली. ते गंभीर जखमी झाले. त्यांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. आमदार बबनराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील, भीमानगरकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील यांनी दु:ख व्यक्त करीत कुटुंबाचे सांत्वन केले.

--------

फोटाे : २७ जितेंद्र जाधव

Web Title: Hotelier killed in car crash