शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

अक्कलकोटमधील बागायतदारांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:21 IST

अतिवृष्टीचा फटका; अक्कलकोट तालुक्यात ५०० हेक्टरवर फळपिकांचे नुकसान

ठळक मुद्देअक्कलकोट तालुक्यात नागणसूर, जेऊर, तडवळ, दुधनी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्रफळद्राक्ष बागायतदारांची संघटना असून, एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मजूर पुरवठा करण्याचे काम करतातफवारणीवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची सल आता शेतकºयांना आहे

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : मागील १५ दिवसांपासून सतत होणाºया पावसामुळे तालुक्यातील फळपिके आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ दुष्काळसदृश स्थितीत पाणीटंचाई असतानाही टँकरने पाणीपुरवठा करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग जगविली़ आज अक्कलकोट तालुक्यातील शेतकºयांच्या तोंडचा घास अतिवृष्टीने हिरावला आहे़ तालुक्यात ५०० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़ या नैसर्गिक संकटाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.

द्राक्ष म्हटलं की सर्वप्रकारच्या पिकांमधील नाजूक फळपीक. या पिकाकडे सर्वसामान्य शेतकरी शक्यतो वळत नाही. कारण खर्चिक पीक म्हणून याकडे पाहिले जाते. अलीकडच्या काळात शासनाकडून फळपिकांबाबत शेतकºयांना प्रोत्साहन मिळाल्याने द्राक्ष, डाळिंब या पिकांच्या क्षेत्रफळात मोठी वाढ झाली़ एखादे वर्ष वगळता अचानक रोगराई पसरण्याचे प्रकार घडत आहेत़ मात्र औषध फवारणी केल्याबरोबर तत्काळ सुधारणा होत असे. यंदा मात्र नेमके सर्वकाही उलटं होत आहे.

दरवर्षी औषधाच्या खर्चात तिपटीने वाढ होत आहे़ २४ सप्टेंबरपर्यंत म्हणावा तसा पाऊस झाला नाही़ द्राक्षाच्या काडीची वाढ व्यवस्थित झाली नाही. एकंदरीत द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, लिंबू यासह वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, बटाटे अशाप्रकारे ५०० हेक्टरवरील बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

आता मजुरांचा तुटवडा - गतवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे बागा जगवताना बागायतदारांना नाकीनऊ आले होते. दरम्यान, पावसाळ्यात पाऊस झाला नाही़ १० आॅक्टोबर २०१९ पूर्वी छाटणी केलेल्या बागावर दावणी, करपा यासारख्या रोगांचा प्रसार झाला आहे़ यामुळे हातातून बागा जाण्याच्या भीतीने महागडी औषध फवारणी केली आहे तसेच ज्यांनी १६ व १७ आॅक्टोबरदरम्यान बागांची छाटणी केली आहे त्यांच्या बागेवर मोठ्या प्रमाणात दावणी, करपा रोग फैलावला आहे. रोग पसरल्यानंतर तत्काळ आटोक्यात आणावे लागते. त्यासाठी मजुरांची फार मोठी गरज भासते. नेमके ते मिळत नाहीत. कमतरतेमुळे वेळेवर कामे होत नाहीत़ याचाही फटका शेतकºयांना बसला आहे.

फवारणीदेखील वाया...- रोज सायंकाळी पाऊस होत असल्याने रात्रभर द्राक्षाची पाने ओलसरपणा धरतात़ त्यात भर म्हणून सकाळी दव व धुके पडत आहेत़ द्राक्षावर मारण्यात आलेल्या औषधांचा फारसा परिणाम झालेला नाही़ फवारणीवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची सल आता शेतकºयांना आहे़ 

तडवळ, नागणसूर, जेऊर भागात सर्वाधिक बागायती- अक्कलकोट तालुक्यात नागणसूर, जेऊर, तडवळ, दुधनी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्रफळ आहे. अनेक वेळा मजुरांअभावी कामे वेळेत होत नाहीत. द्राक्ष बागायतदारांची संघटना असून, एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मजूर पुरवठा करण्याचे काम करतात़ यंदा मात्र मजूर मिळत नाहीत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसakkalkot-acअक्कलकोट