फलोत्पादन अभियान : सोलापूरची आघाडी
By Admin | Updated: September 3, 2014 00:39 IST2014-09-03T00:39:14+5:302014-09-03T00:39:14+5:30
राज्यभरातून अवघ्या १६ हजार शेतकऱ्यांची मागणी

फलोत्पादन अभियान : सोलापूरची आघाडी
सोलापूर: राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतीपूरक योजनांसाठी राज्यभरातून १६ हजार २०९ शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केले असून एकट्या सोलापूर जिल्ह्यातून ५ हजार ६०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नाशिक, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, धुळे व बुलढाणा जिल्ह्यातूनही फलोत्पादनासाठी शेतकरी पुढे आले आहेत.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेती व्यवसायासाठी विविध योजना राबविल्या जातात. यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातून आलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा फलोत्पादन अभियान समितीमार्फत आलेल्या अर्जातून सोडत काढली जाते. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज असले तरच सोडत काढण्यात येते. सेटनेट, पॅकहाऊस, प्रक्रिया केंद्र अशा २८ बाबींसाठी शासनाचे अनुदान मिळते.
सोलापूर, जालना, नाशिक, औरंगाबाद, धुळे, बुलढाणा, कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यातून फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत.
-------------------------
सोलापूरपाठोपाठ नाशिक जिल्हा
४ सोलापूर- ५,६०९, नाशिक-२१७८, जालना- १६९५, अहमदनगर- १२२६, औरंगाबाद-९८३, धुळे- ६४९, बुलढाणा- ५०८, कोल्हापूर-४२६, जळगाव-४४४, सातारा-२७४, परभणी-२२३, वाशिम-२०८, सिंधुदूर्ग-१९७, लातूर-१८३, रत्नागिरी-१७५, नंदूरबार-१७५, ठाणे-१२०, बीड-११०, नांदेड-१०२, सांगली-९९, वर्धा-९२, नागपूर-९१, रायगड-८७, यवतमाळ-७०, उस्मानाबाद-६०, अमरावती-५१, पुणे-४९, गोंदिया-४०, हिंगोली-३६, अकोला-३०, गडचिरोली-७, चंद्रपूर-६, भंडारा-४ याप्रमाणे फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
-------------------------------------
पंढरपूरच्या ११२५ शेतकऱ्यांची मागणी
४जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केल्याने सोडतीतून नशीब आजमावे लागत आहे. पंढरपूर तालुक्यातून ११२५, करमाळा-८५९, माळशिरस-८१०, माढा-५३३, मोहोळ-४६२, दक्षिण सोलापूर-३७७, सांगोला-३७५, बार्शी-३५१, मंगळवेढा-३३८, उत्तर सोलापूर-१९७, अक्कलकोट-१८२़
-------------------------------
शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण झाल्याने सोलापूर जिल्ह्यातून अर्जांची संख्या अधिक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सोडत काढण्यात आली आहे. जिल्ह्याला ९ कोटी ३५ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
- रफिक नाईकवाडी, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी