मस्तुद दांपत्य पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:36+5:302021-03-24T04:20:36+5:30

कुर्डूवाडी : दंतवैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत माढा तालुक्यातील रोपळे येथील डॉ. संतोषकुमार पांडुरंग ...

Honored with Mastud Marital Award | मस्तुद दांपत्य पुरस्काराने सन्मानित

मस्तुद दांपत्य पुरस्काराने सन्मानित

कुर्डूवाडी : दंतवैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत माढा तालुक्यातील रोपळे येथील डॉ. संतोषकुमार पांडुरंग मस्तुद यांना हॉटेल ऑर्किड, विलेपार्ले,मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात दंतवैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामाबद्दल ‘इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्डस २०२०' व इंटरनॅशनल डेंटल एक्सलेन्स अवॉर्डस २०२०' यांच्याकडून 'बेस्ट क्लिनिकल प्रॅक्टिशनर-डेंटल' या विभागात पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच डॉ. चैत्रा संतोषकुमार मस्तुद ,एम. डी. एस.,(पीएच. डी.) प्रोफेसर, डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल,पिंपरी, पुणे,इंडियन हेल्थ प्रोफेशनल अवॉर्डस २०२०

दंतव्यंगोपचार या विभागात केलेले उत्कृष्ट काम आणि नवीन संशोधनाबद्दल त्यांचा 'एक्सलेन्स ईन क्लिनिकल डेंटल इंनोव्हेशन,ऑर्थोडोंटिक्स व डेंटोफॅसिएल ऑर्थोपेडिक्स' या विभागात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अभिनेते जॉनी लिव्हर, हिंदी अभिनेते अली खान, मराठी आणि हिंदी अभिनेते अजित जोग, डॉ.अरुण दोडामनी, डॉ. राहुल हेगडे, डॉ.उज्ज्वल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त डॉ. स्वप्नील बंब आणि सुरेखा ढगे यांच्या उपस्थितीत पार पडला. या पुरस्काराबद्दल त्यांचे डॉ.पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, उपकुलपती डॉ. स्मिता जाधव, डॉ. एन.जे. पवार, डॉ. सुर्येकर, डॉ. डी गोपालकृष्णन डीन यांनी कौतुक केले.

-----

२३ मस्तुद

मस्तुद दांपत्याचा पुरस्काराने सन्मान करताना अभिनेते जॉनी लिव्हर, अभिनेते अली खान, अजित जोग, डॉ.अरुण दोडामनी.

Web Title: Honored with Mastud Marital Award