शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

'शिवसेना-भाजपाच्या एकतर्फी प्रेमात कुणाचाही 'ऑनर किलींग' होणार नाही'

By राजा माने | Updated: December 24, 2018 17:33 IST

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती होणारच, असे भाजपा नेते ठामपणे सांगत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहांपासून ते आपणापर्यंत सर्वच भाजपा नेते सेना-भाजपा युतीचे संकेत देत आहेत.

राजा माने

सोलापूर - कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती होणारच, असे भाजपा नेते ठामपणे सांगत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहांपासून ते आपणापर्यंत सर्वच भाजपा नेते सेना-भाजपा युतीचे संकेत देत आहेत. मात्र, शिवसेना याबाबतीत गंभीर नसून भाजपाचे ते एकतर्फी प्रेम असल्याचे सांगते. त्यामुळे या प्रेमात ऑनर किलींग कोणाचा होईल, की हे प्रेम सफल होणारंय ? असा प्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. त्यावर बोलताना, यामध्ये कुणाचाही ऑनर किलींग होणार नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलंय.

आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना युतीबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील  यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, भारतीय जनता पार्टी मजबूत असून त्यात कील होण्याचा प्रश्नच नाही, असे पाटील यांनी म्हटलं. पुढ बोलताना ते म्हणाले की, मुलगा मोठा झाला की आईला बघत नाही म्हणून आई त्याच्यावरील प्रेम कमी करत नाही. जर, मुलगा म्हटलेलं शिवसेनेला आवडत नसेल तर दोन भावांचंही उदाहरण देता येईल. आता, आमच्या घरात तीन मांजरं आहेत, त्यातली दोन मांजरं एका आईची आहेत. त्यातलं तिसरं मांजर आहे  ते दुसरीचं. मग, त्या दोघा मांजरांच एकमेकांवर खूप प्रेमय, पण तिसरीशी नाही. तसं, सर्वच राजकीय पक्ष आमचे मित्र असावेत, असंही काही नाही. मात्र, हे आमचे सख्खे भाऊ आहेत, त्यामुळे त्यांच आमच्यावर जरा जास्त प्रेम आहे. आमच्या दोघांच्याही रक्तात हिंदुत्व आहे, त्यामुळे ते कसेही वागू आम्ही शेवटपर्यंत हेच म्हणणार. तसेच, यापूर्वी 2014 मध्ये आम्ही वेगळे लढलो, म्हणून काय आमचा पाया ढिसूळ झाला का, असा प्रतिप्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी केला. आम्ही दोन खासदारांपासून ते सत्ताधारीपर्यंत मजल मारल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. 

दरम्यान, शिवसेनेनं उचलून धरलेल्या राम मंदिर मुद्द्याबाबत उत्तर देताना पाटील म्हणाले,  राम मंदिर हा ना भाजपाचा मुद्दा आहे, ना संघाचा, ना शिवसेनेचा. राम मंदिर हा देशातील प्रत्येक हिंदूचा मुद्दा आहे. या देशावर प्रेम करणाऱ्या, या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा, मग तो मुस्लीम का असेना. त्यामुळे  शिवसेनेनं हा मुद्दा उचलून धरला तर त्यात बिघडलं काय, शेवटी कुणाच्याही कोंबड्यानं का हुईना, सूर्य उगवला म्हणजे झालं, अशा शब्दात पाटील  यांनी शिवसेनेनं उचलून धरलेल्या राम मंदिराच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूर