शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

प्रामाणिकपणा; ३.६३ लाख ग्राहकांनी स्वत:हून पाठविले वीज मीटर रिडींग

By appasaheb.patil | Updated: May 6, 2020 15:27 IST

महावितरण; ‘कोरोना’ मुळे वीजबिलांची छपाई व वितरण बंद

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेतमहावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केलीवीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद करण्यात आले आहे

सोलापूर : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील ३ लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वत:हून मीटर रिडींग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार महावितरणकडून वीजबिल दिलेले आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील ५८ हजार २१० वीजग्राहकांचा समावेश आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांनी सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, महावितरणची वेबसाईट व ह्यमहावितरणह्ण मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रिडींगचे फोटो पाठवून स्वत: रिडींग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रिडींगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडींगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून ह्यएसएमएसह्ण पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडींग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल ३ लाख ६३ हजार १७५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रिडींग पाठविले आहे.

महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीतजास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून प्रत्यक्ष रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रिडींगचा फोटो अपलोड करून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ---------------असे आहेत परिमंडलनिहाय रिडींग पाठविणारे ग्राहकमहावितरणकडे स्वत:हून मीटर रिडींग पाठविलेल्या वीजग्राहकांमध्ये पुणे परिमंडलामधील ६९९१२, कल्याण- ५८२१०, भांडूप- ३७५४३, नागपूर- २७७२०, नाशिक- २५८३१, कोल्हापूर- २२७२८, बारामती- २०९४१, जळगाव- १७६६४, औरंगाबाद- १६३७४, अकोला- १३७६७, अमरावती- १३५४०, चंद्रपूर- ८८२४, कोकण- ८५४२, नांदेड- ७३४८, गोंदिया- ७२६८ आणि लातूर परिमंडलामधील ६९६३ वीजग्राहकांचा समावेश आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmahavitaranमहावितरण