शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कॉरंटाईन झालेल्या रुग्णांची घरे असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 17:58 IST

सोलापूर शहरातील दुसरी घटना; मालकासह भाडेकरचे घर फोडून चोरून नेला दिड लाख रुपयांचा ऐवज

ठळक मुद्दे- सोलापूर शहरात चोरीचे प्रमाण वाढले- सोलापूर शहर पोलिसांचे दुर्लक्ष- एकीकडे कोरोना तर दुसरीकडे चोरीने नागरिक भयभीत

सोलापूर : कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कॉरंटाईन झालेल्या मालकासह भाडेकरूचे घर फोडून अज्ञात चोरट्याने आतील दीड लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार दि. ३० जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. शहरात चार दिवसांमध्ये घडलेली ही दुसरी घटना असून, कॉरंटाइन झालेल्या रुग्णांची घरे असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. 

चार दिवसापूर्वी बुवा गल्ली भूषण नगर येथील एका घरातील व्यक्तीला कोरोना चे लक्षण आढळून आले, त्यामुळे तपासण्यासाठी शासकीय रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते. स्वाईब तपासणी केल्यानंतर त्या व्यक्तीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाला आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने संबंधित व्यक्तीच्या घरातील कुटुंबीयांना व त्यांच्या येथे राहणाºया भाडेकरूंना केळगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कॉरंटाईन करण्यात आले होते. घर मालक व भाडेकरू हे सर्वजण कॉरंटाइन झाल्यामुळे घराला कुलूप लावण्यात आले होते. 

घरात कोणी नसल्याचे व सर्वाना कॉरंटाईन केल्याचे लक्षात आल्यानंतर अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत, घर मालकाच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाट फोडून आतील सोन्या-चांदीचे दागिने व किचन रूम मधील गॅसची टाकी चोरली. एवढ्यावर चोरटे न थांबता त्यांनी शेजारीच असलेल्या भाडेकरूच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला व तेथील कपाटातून सोन्याचे दागिने व गॅस टाकी असा सर्व मिळून १ लाख ४७ हजार ४०० रुपये किंमतीच्या ऐवजाची चोरी केली. दोन्ही घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शेजारी राहणाºया लोकांनी संबंधित घरमालकास फोन करून याची माहिती दिली. चोरीची माहिती सलगर वस्ती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी नातेवाईक किरण राम व्हॅनकोरे (वय  २५, रा रेल्वे लाईन, कोनापुरे चाळ, सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भुसनुर हे करीत आहेत.  

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या