शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

होमगार्डने दीडशे दिवसांचे मानधन न उचलून ‘कोविड’ कार्यासाठी उचलला खारीचा वाटा

By appasaheb.patil | Updated: September 25, 2020 11:13 IST

खाकी वर्दीतली माणुसकी; पंढरपूरच्या रफिक नदाफच्या दातृत्वाची सर्वत्र प्रशंसा

ठळक मुद्देकोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून अनेक कोरोना योद्ध्यांची नावे समोर आली, त्यातीलच एक नाव म्हणजे रफिक महामूद नदाफरफिकचे शालेय शिक्षण सरस्वती, माध्यमिक शिक्षण विवेक वर्धिनीत तर पदवीचे शिक्षण केबीपी महाविद्यालयात पूर्ण केलेमाणुसकी घटत चाललेल्या समाजात या होमगार्डने कोरोना उपचाराच्या मोठ्या कार्यासाठी दिलेली मदत खारीचा वाटा

सुजल पाटील

सोलापूर : होमगार्डचे काम वर्षातले काहीच दिवस...एरव्ही मिळेल ती रोजंदारी... कधी तरी मिळणाºया होमगार्डच्या कामाचे १५० दिवसांचे मानधनही ‘कोविड’साठी सरकार करत असलेल्या कामांसाठी बहाल.. दानशूरतेची ही कहाणी आहे. पंढरपूरच्या कोरोना सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या रफिक नदाफ यांची..माणुसकी घटत चाललेल्या समाजात या होमगार्डने कोरोना उपचाराच्या मोठ्या कार्यासाठी दिलेली मदत खारीचा वाटा असली तरी तिचे मोल मोठे असल्याने रफिक यांची प्रशंसा होत आहे.

कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून अनेक कोरोना योद्ध्यांची नावे समोर आली, त्यातीलच एक नाव म्हणजे रफिक महामूद नदाफ़ रफिकचे शालेय शिक्षण सरस्वती, माध्यमिक शिक्षण विवेक वर्धिनीत तर पदवीचे शिक्षण केबीपी महाविद्यालयात पूर्ण केले़ रफिकची घरची परिस्थिती खूपच हलाखीची आहे.  एरव्ही तो गवंड्याच्या हाताखाली, मंडप उभारणी किंवा अन्य मोलमजुरीची कामे करून घर सांभाळतो. एमआयटी कोविड सेंटरमध्ये केलेल्या नि:स्वार्थ कामामुळे रफिकचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनीही त्यांचा सन्मान केला.-पाच महिने असे केले होमगार्ड रफिकनं कामहोमगार्ड रफिक नदाफ यास पंढरपुरातील एमआयटी येथील कोविड सेंटरवर बंदोबस्ताची ड्यूटी लावण्यात आली होती़ एका महिन्यानंतर रफिकची ड्यूटी संपली़ त्यानंतर रफिकनं विनामोबदला एमआयटी कोविड सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली़ कोविड सेंटरमध्ये रफिक कोरोनाग्रस्तांचे मनोबल वाढविण्यासाठी योगासने, व्यायाम, म्युझिक थेरपीवर डान्स, संगीत, गाण्यांच्या भेंड्या, विनोदी भूमिकेतील एकपात्री नाटक अशा एक ना अनेक कार्यक्रमातून कोरोनाग्रस्तांना दिलासा देण्याचे काम केले.---------गडचिरोलीत बजावली सेवारफिक हा २०१८ साली सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील होमगार्डमध्ये भरती झाला़ सुरुवातीच्या काळात रफिकनं लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रांवर बंदोबस्ताचे काम केले़ त्यानंतर गडचिरोलीतील निवडणूक कामावेळी त्यांनी बंदोबस्ताची भूमिका बजावली़ याशिवाय पंढरपुरातील आषाढी वारीतही त्यांनी आपले योगदान दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस