शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गृहविभागाचा उपक्रम; सोलापुरात लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 11:03 IST

गुन्ह्यातील पुराव्यांची तपासणी होणार सोलापुरात

ठळक मुद्देगुन्ह्यातील पुरावे व व्हिसेरा प्रयोगशाळेत आल्यास अवघ्या आठ दिवसांत त्याचा अहवाल तयार होणारभविष्यात आणखी दोन विभाग सुरू करण्याचा मानस असून, त्यासाठी प्रशस्त अशी शासकीय जागा शोधण्याचे काम सुरू

सोलापूर : गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावरील पुराव्यांवर रासायनिक विश्लेषण करून त्याचा अहवाल तत्काळ न्यायालयात सादर करण्यासाठी नवीन वर्षात सोलापुरात लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. गृहविभागाने महाराष्ट्रात पाच ठिकाणी अशा प्रयोगशाळा सुरू केल्या असून त्यात सोलापूरचा समावेश आहे. प्रयोगशाळेला शेजारचा उस्मानाबाद हा जिल्हा जोडण्यात आला असल्याची माहिती लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. नितीन चुटके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

सोलापुरात जुळे सोलापूर डी-मार्टजवळील नरसिंह नगर येथे ही प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) सुरू होत आहे. प्रयोगशाळेत उपसंचालक, सहायक संचालक, वरिष्ठ लिपिक, तीन टेक्निशियन आणि नऊ कर्मचारी असणार आहेत. प्रयोगशाळेत सध्या जीवशास्त्र व विषशास्त्र असे दोन विभाग आहेत. जीवशास्त्र विभागात खून, अत्याचार, विविध गुन्ह्यात कपड्यावर पडलेले रक्त, वीर्य, व्हिसेरा आदींची तपासणी होऊन त्याचे विश्लेषण केले जाणार आहे. विषशास्त्र विभागात शेतकरी आत्महत्या, विषप्राशन, दारूमध्ये विष घालून पाजले असेल, पोटातील पाणी, उलटी, रक्त याचे रासायनिक विश्लेषण केले होणार आहे. 

महाराष्ट्रात वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, अमरावती व नाशिक या आठ ठिकाणी आहेत. पूर्वी सोलापूर शहर व जिल्ह्यात गुन्हा घडल्यास घटनास्थळावरील पुरावे तपासण्यासाठी पुणे येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवले जात होते. प्रयोगशाळेचा अहवाल येण्यास २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागत होता. यामुळे न्यायालयात गुन्हेगारांवरील सुनावणीला वेळ लागत होता. गुन्ह्याचे वाढते प्रमाण व प्रयोगशाळेच्या अहवालासाठी लागणारा वेळ लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने राज्यात पाच नवीन लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे आणि सोलापूरचा समावेश आहे. 

भाडेतत्त्वावर घेतली खासगी इमारत

  • लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेसाठी पूर्वी पोलीस मुख्यालयातील इमारत निश्चित करण्यात आली होती. मात्र तेथील नूतनीकरण व अन्य कामासाठी लागणारा निधी पाहता गृहविभागाने सध्या भाडेतत्त्वावर कार्यालय घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयोगशाळेचे सर्व काम पूर्ण झाले असून १७ जानेवारीला याचे उद्घाटन होणार आहे. 
  • आठ दिवसांत सुरू होणार कामकाज
  •  प्रयोगशाळेचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात कामकाज सुरू होणार आहे. आवश्यक तो कर्मचारीवर्ग या ठिकाणी नेमण्यात आला असून, सोलापूर शहर, जिल्हा व उस्मानाबाद येथील गुन्ह्यात तपासकामी लागणारे पुरावे प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. 

आणखी दोन विभाग सुरू करण्याचा मानस : नितीन चुटकेमहाराष्ट्रात असलेल्या मोठ्या आठ प्रयोगशाळेत एकूण ७ ते ८ विभाग आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या गुन्ह्यातील पुराव्यांवर कामकाज चालते. सोलापूर व उस्मानाबाद येथील बहुतांश गुन्हे हे प्रलंबित आहेत. खून अत्याचार, खुनाचा प्रयत्न, कपड्यावरील रक्ताचे डाग आदी प्रकारच्या पुराव्यांचा अहवाल येण्यास वेळ लागतो. त्यामुळे सध्या जीवशास्त्र व विषशास्त्र हे दोन विभाग सुरू करण्यात आले आहेत. यासाठी हेड स्पेस गॅस क्रोमॅटोग्राफ, युवी स्पेक्टो फोटोमीटर आदी इतर मशिनरी प्रयोगशाळेत बसवण्यात आल्या आहेत.

गुन्ह्यातील पुरावे व व्हिसेरा प्रयोगशाळेत आल्यास अवघ्या आठ दिवसांत त्याचा अहवाल तयार होणार असून, तो तत्काळ न्यायालयात सादर केला जाणार आहे. भविष्यात आणखी दोन विभाग सुरू करण्याचा मानस असून, त्यासाठी प्रशस्त अशी शासकीय जागा शोधण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. नितीन चुटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी