बार्शीत मोर्चा काढून वीज बिलाची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:10+5:302021-02-05T06:47:10+5:30

बार्शी : लॉकडाऊन कालावधीतील अंदाजे आणि वाढीव वीज बिलावरून आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज शहराध्यक्ष राजेंद्र ...

Holi on electricity bill by removing the front in Barshi | बार्शीत मोर्चा काढून वीज बिलाची केली होळी

बार्शीत मोर्चा काढून वीज बिलाची केली होळी

बार्शी : लॉकडाऊन कालावधीतील अंदाजे आणि वाढीव वीज बिलावरून आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण

सेनेच्या वतीने आज शहराध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या

नेतृत्वाखाली मोर्चा काढला. त्यानंतर वाढीव बिलाची होळी करीत शुल्क माफ करण्याची मागणी केली.

यावेळी महावितरणचे अभियंता घोलप यांनी निवेदन देऊन मागण्यांवर चर्चा केली.

या मोर्चात ओंकार हिरेमठ, वैभव काटवटे, साहिल मदने, अमोल वाघमारे, गुणवंत बाबर, विशाल पांढरे, पवन ठाकूर,

श्रीनिवास सद्वतरे,सुमित साखरे सहभागी झाले होते.

यावेळी वीजबिलाची होळी करून महावितरणच्या

कामकाजाचा निषेध केला. लॉकडाऊन कालावधीतील संपूर्ण वीज बिल माफ करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी गायकवाड म्हणाले, लॉकडाऊन काळात रोजगार बंद असल्याने बहुतांश लोक हे घरात होते. काम बंद होते. अशा काळात वीज वापरलीच नाही. त्यामुळे वीज बिल कसे ? असा सवाल करत या काळातील सर्व वीज बिल माफ करावे अशी मागणी करीत यावेळी बिलाची होळी केली.

---

फोटो : ०२ बार्शी

मनसेच्या वतीने बार्शीत वीज बिलाविरोधात मोर्चा काढण्यात आला.

Web Title: Holi on electricity bill by removing the front in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.