शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

शासकीय दप्तर दिरंगाचा फटका, उरणकरांच्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामांचा खर्च 5 वर्षांत ५८ वरून ७५ कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 18:31 IST

देशाला व्यापारातून दरवर्षी सुमारे ७५-८० हजार कोटी महसूल मिळवून देणाऱ्या उरणला उरणकरांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाला १२ वर्षांतही १०० खाटांचे  उपजिल्हा रुग्णालय उभारता आलेले नाही.

उरण : उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा खर्च शासकीय अनागोंदी कारभार आणि कामाच्या विलंबामुळे ५८ कोटी खर्चाचे काम ७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.त्यातच सिडकोने रुग्णालयासाठी दिलेल्या ५९०० चौमी जागेपैकी ९८० चौमी जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडल्याने कामगारांच्या वसाहतीसाठी आता येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाच्या पडीक जमिनीचा वापर करावा लागणार आहे. यासाठी १७ कोटी रुपये खर्ची पडणार असुन या दोन्ही कामांच्या ९३ कोटीं खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

देशाला व्यापारातून दरवर्षी सुमारे ७५-८० हजार कोटी महसूल मिळवून देणाऱ्या उरणला उरणकरांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाला १२ वर्षांतही १०० खाटांचे  उपजिल्हा रुग्णालय उभारता आलेले नाही. उरण सामाजिक संस्थेच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर उरणकरांसाठी मल्टी स्पेशालिटी इस्पितळसाठी सिडकोने द्रोणागिरी नोडमधील बोकडवीरा येथे ५९०० स्वेअर मीटर क्षेत्राचा भुखंड दिला आहे.या भुखंडाची ८४ लाख किंमतही शासनाने सिडकोला अदा केली आहे. त्यानंतर सिडकोने इस्पितळसाठी दिलेल्या भुखंडाची पाहणी करुन दोन वर्षातच रुग्णालय उभारण्याचे आश्र्वासन दिले  होते.

मात्र सिडकोची घोषणा हवेतच विरली आहे.त्यानंतर उरण परिसरात जेएनपीए,ओएनजीसी,जीटीपीएस, बीपीसीएल,सिडको आदी विविध कार्यरत असलेले प्रकल्प वर्षीकाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांहूनही अधिक नफा कमवित आहेत.केंद्र सरकारला या कंपन्या,प्रकल्पाकडून वर्षाकाठी ७५-८० हजार कोटी महसूल मिळवून दिला जात आहे.अशा या नफा माविणाऱ्या शासकीय कंपन्या प्रकल्पाकडून १०० खाटांचे मल्टी स्पेशालिटी इस्पितळ उभारण्यासाठी निधी उभारण्याच्या आदेश तत्कालीन राज्य सरकारच्या अर्थ मंत्रालयाने संबंधित विभागाला दिले होते.मात्र प्रकल्प, कंपन्यांनी रुग्णालय उभारण्यासाठी अद्याप तरी छदामही दिला नाही.

यामुळे १०० खाटांचे मल्टी स्पेशालिटी इस्पितळ उभारण्याचे काम सुरू झालेले नाही.शासकीय प्रकल्प व  छोट्या-मोठ्या अनेक कंपन्यांनी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यासाठी मदतीसाठी हात आखडता घेतल्याने मागील १२ वर्षांनंतरही हॉस्पिटल उभारणीचे काम तसुभरही पुढे सरकलेले नाही.यामुळेउरणवासीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

 दरम्यान शासनाने २०१८ साली या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामासाठी ५८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र या कामात झालेल्या विलंबामुळे कामाच्या खर्चात मागील पाच वर्षात ४७ कोटींची वाढ झाली आहे. तसेच ५९०० चौमी जागेपैकी ९८० चौमी जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहे.त्यामुळे या जागेत कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत निर्माण करणे शक्य होणार नाही. शासनाने १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले आहे.या रुग्णालयाच्या बांधकामांचा खर्च पाच वर्षांपूर्वी ५८ कोटी होता.आता हा खर्च ७५ कोटींपर्यंत पोहोचला आहे.या खर्चात सुसज्ज,अद्यावत तळमजल्यासह पाच मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.५९०० चौमी जागेपैकी  ८५० चौमी जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे त्याजागी बांधकाम करणे शक्य होणार नाही.त्यामुळे कामगारांच्या वसाहतीसाठी आता येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाच्या पडीक जमिनीचा वापर करण्यात येणार आहे.या वसाहतीमध्ये वर्ग -१ ते वर्ग -४ मधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ४८ फ्लॅट तयार करण्यात येणार आहेत.यासाठी १७ कोटी रुपये खर्ची पडणार असुन या दोन्ही कामांच्या ९३ कोटीं खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश पवार यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार