फरशीने भरलेल्या ट्रकची धडक; करमाळ्याजवळ वृध्दाचा जागीच मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: December 22, 2022 13:43 IST2022-12-22T13:43:34+5:302022-12-22T13:43:42+5:30
या घटनेची माहिती मिळताच दुर्गुडे परिवारातील लोकांनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती.

फरशीने भरलेल्या ट्रकची धडक; करमाळ्याजवळ वृध्दाचा जागीच मृत्यू
सोलापूर/करमाळा : करमाळा -रोसेवाडी रस्त्यावर शहरालगत तुकाराम नगर येथे हॉटेल दिवाणजीसमोर फरशी भरलेला मालट्रकने चिरडल्याने रोसेवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहन दुर्गुडे (वय-५०)असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
गुरुवार २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती समजताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पो.हे.कॉ. संतोष देवकर यांनी तत्काली घटनास्थळी धाव घेत मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केला आहे. ट्रक व ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. सध्या वीट-करमाळा रस्त्याचे काम सुरू असून नेमक्या चिंचोळ्या जागेवरच सदर ट्रक मागे घेत असताना दुर्गुळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच दुर्गुडे परिवारातील लोकांनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती. ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम करमाळा पाेलिसात सुरू आहे. ट्रक व ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.