हिराबाई चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:42 IST2021-02-21T04:42:11+5:302021-02-21T04:42:11+5:30

कुरुल : येथील हिराबाई श्रीमंत चव्हाण (९५, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, ...

Hirabai Chavan passed away | हिराबाई चव्हाण यांचे निधन

हिराबाई चव्हाण यांचे निधन

कुरुल : येथील हिराबाई श्रीमंत चव्हाण (९५, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी सरपंच हंबीरराव चव्हाण यांच्या मातोश्री होत.

तुकाराम कदम

अनगर : शेतकरी तुकाराम कोंडीबा कदम (८०, रा. अनगर, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अनगरचे उद्योगपती राम कदम यांचे ते चुलते होत.

करीमबी पटेल

सोलापूर : करीमबी याकुब पटेल (७९, रा. खैराट, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली असा परिवार आहे.

नागनाथ स्वामी

सोलापूर : नागनाथ संभय्या स्वामी (७९, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वडाळ्यातील शिवरत्न कृषी केंद्रचालक दीपक स्वामी यांचे ते वडील होत.

Web Title: Hirabai Chavan passed away