हिंगणीत वाळूसह ट्रॅक्टरट्राली पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST2021-03-27T04:23:16+5:302021-03-27T04:23:16+5:30

वैराग : हिंगणी (ता. बार्शी) येथे नागझरी नदीपात्रातून शुक्रवार मध्यरात्री बेकायदेशीर वाळू उपसा करत असताना एकास वैराग ...

Hingani caught a tractor-trolley with sand | हिंगणीत वाळूसह ट्रॅक्टरट्राली पकडली

हिंगणीत वाळूसह ट्रॅक्टरट्राली पकडली

वैराग : हिंगणी (ता. बार्शी) येथे नागझरी नदीपात्रातून शुक्रवार मध्यरात्री बेकायदेशीर वाळू उपसा करत असताना एकास वैराग पोलिसांनी रंगेहाथ पकडले. वाळूसह जवळपास सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

वैराग पोलिसांनी विकास जयराम दळवी वय (२३, रा. हात्तीज, ता. बार्शी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवार मध्यरात्री वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांना बेकायदेशीर वाळू उपसाबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी पहाटे दोनच्या दरम्यान हिंगणी येथील नागझरी नदीपात्रात धाड टाकली. दरम्यान ट्रॅक्टरमधून एक ब्रास वाळू घेऊन जाताना चालक निदर्शनास आला. पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक विकास दळवी यांच्याविरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Hingani caught a tractor-trolley with sand