शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

उच्च न्यायालयाच्या निकालाने सोलापूर जिल्हा परिषदेत सत्ताबदलाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 1:14 PM

पदाधिकाºयांची सावध भूमिका: बळीराम साठे म्हणाले पवार यांना भेटणार

सोलापूर: मुंबई उच्च न्यायालयाने ‘त्या’ सहा सदस्यांचे अपील फेटाळल्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गुरूवार व शुक्रवारी जिल्हा परिषदेत कामानिमित्त आलेल्यांच्या तोंडी हाच विषय होता, मात्र पदाधिकाºयांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच पण मोहिते-पाटील गटाच्या मंगल वाघमोडे, अरुण तोडकर, नंदा फुले, शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील व गणेश पाटील या सहा जणांनी विरोधात मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून सत्ता गेली. या सहा बंडखोर सदस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हाधिकाºयाकडे तक्रार दाखल केली. सुनावणीदरम्यान या सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने बुधवारी या सहा जणांची याचिका फेटाळली. 

दरम्यान, या प्रकरणावर  प्रतिक्रिया देताना साठे म्हणाले की, निर्णयाबाबत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढील सुनावणीबाबत जिल्हाधिकाºयांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले. या निकालामुळे सत्तांतर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.

भाजपचे आनंद तानवडे, मदन दराडे यांनी अजून जिल्हाधिकाºयांपुढे सुनावणी प्रक्रियेस बराच वेळ असल्याने विद्यमान पदाधिकाºयांना तूर्त धोका नसल्याचे सांगितले. अ‍ॅड. सचिन देशमुख यांनी हा विषय चचेर्चा झाल्याचे स्पष्ट केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष वगळता इतर पदाधिकाºयांनी गुरुवारी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

निकाल आल्यानंतर पाहू...जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. अपील फेटाळले आहे. जिल्हाधिकाºयांकडे सुनावणी होऊन निकाल काय येईल त्यावेळी पाहू, असे सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस