जगदाळे मामा हॉस्पिटलकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:54+5:302021-08-21T04:26:54+5:30
बार्शी : डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाच्या वतीने कोकण व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी ८१ हजार ४०० रुपयांचा निधी कामगारांच्या ...

जगदाळे मामा हॉस्पिटलकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
बार्शी : डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाच्या वतीने कोकण व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी ८१ हजार ४०० रुपयांचा निधी कामगारांच्या वतीने देण्यासाठी जमा करण्यात आला. ही रक्कम एक लाख एक हजार व्हावी यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांनी या रकमेमध्ये १९ हजार ६०० रुपये जमा करून एक लाख एक हजार रुपये रक्कम जमवली.
ही रक्कम नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांच्याकडे धनादेशद्वारे संघटनेचे अध्यक्ष तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सुपूर्द करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार काझी, हवलदार भालेराव, संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामचंद्र जगताप, संघटनेचे कार्याध्यक्ष लहू आगलावे, सचिव धनाजी पवार, प्रवीण मस्तुद, डॉ. सुरेश सावंत, डॉक्टर हर्षद बारसकर, डॉ. सुरेखा माळवे, भारत भोसले, भारती मस्तुद, महादेव ढगे, बिभीषण हुरकूडे, संगीता गुंड, किसन मुळे, शहापरी शेख, शिवकन्या भोसले उपस्थित होते.
---
फोटो : २० बार्शी
जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाकडून पूरग्रस्तांसाठी एक लाखाची मदतीचा धनादेश सुपूर्द करताना.
200821\1846-img-20210820-wa0029.jpg
डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाकडून पूरग्रस्तांसाठी 1 लाख, एक हाजाराचा निधी