आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:25 IST2021-09-26T04:25:00+5:302021-09-26T04:25:00+5:30

मोहोळ : स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ येथील भारत माता आदिवासी पारधी समाज व भटके विमुक्त विकास ...

A hearty meal for the students at the Ashram School | आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

मोहोळ : स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ येथील भारत माता आदिवासी पारधी समाज व भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या उपस्थित हा उपक्रम पार पडला.

यावेळी मंगळवेढा येथील आण्णासाहेब पाटील मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, आश्रमशाळेचेेेे प्रमुख ज्ञानेश्वर भोसले, संतोष मिसाळ, भारत ढोले यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती.

अशोक सायकर म्हणाले, मराठा समाजासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले ती थोर व्यक्ती कै. अण्णासाहेब पाटील यांची आज ८८ वी जयंतीच्या निमित्ताने कै. आमदार आण्णासाहेब पाटील क्रीडा, युवक, समाजसेवा व सांस्कृतिक मंडळाने एक स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे.

यावेळी शिवसेनेचे सोमनाथ पवार, आकाश फाटे, छावा संघटना महिला आघाडी शुभांगी लंबे, महेश वठारे, कैलास रणदिवे, नसीर मोमीन, संजय आठवले उपस्थित होते.

---

फोटो : २५ मोहोळ

भारतमाता आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देताना पोलीस निरीक्षक अशोक सायकर, ज्ञानेश्वर भगरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, आश्रम शाळेचेेेे प्रमुख ज्ञानेश्वर भोसले, संतोष मिसाळ, भारत ढोले.

Web Title: A hearty meal for the students at the Ashram School