आरोग्य शिबिरात २७५ महिलाची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:23 IST2021-03-10T04:23:42+5:302021-03-10T04:23:42+5:30
शिबिराचे उद्घघाटन मुख्याधिकारी अमिता दगडे - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उज्वलाताई स़ोपल, लायन्स क्लब रॉयलच्या अध्यक्षा ...

आरोग्य शिबिरात २७५ महिलाची आरोग्य तपासणी
शिबिराचे उद्घघाटन मुख्याधिकारी अमिता दगडे - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उज्वलाताई स़ोपल, लायन्स क्लब रॉयलच्या अध्यक्षा सीमा काळे, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा हेमा कांकरिया, गुंजन जैन, गौरी रसाळ, सुजाता मुथा उपस्थित होत्या.
या शिबिरात डॉ. स्नेहल दोशी (माढेकर),डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. क्षमा बकाल या तज्ज्ञ महिला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली २७५ महिलांच्या शुगर टेस्ट, हिमोग्लोबीन, ब्लड प्रेशर, इ सी जी, त्वचेचे आजार, कॅन्सर इत्यादी चाचण्या म़ोफत करण्यात आल्या.
या शिबिराला माजी आमदार दिलीप सोपल यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरासाठी इनरव्हील क्लब,लायन्स क्लब बार्शी रॉयल याच्या सर्व पदाधिकारी सदस्य तसेच हिरेमठ हाँस्पिटलच्या सर्व मेडिकल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
----09barshi-health chekup
---