मुख्याध्यापक संघ शिक्षकांच्या पाठिशी : तानाजी माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST2021-02-13T04:22:08+5:302021-02-13T04:22:08+5:30

मोहोळ ...

Headmasters team with the support of teachers: Tanaji Mane | मुख्याध्यापक संघ शिक्षकांच्या पाठिशी : तानाजी माने

मुख्याध्यापक संघ शिक्षकांच्या पाठिशी : तानाजी माने

मोहोळ येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेत जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नूतन पदाधिका-यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुधीर गायकवाड होते. यावेळी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक संतोष गायकवाड यांच्या हस्ते तानाजी माने, उपाध्यक्ष महेश सरवदे, सोलापूर शहराध्य्क्ष मन्मथ उकरंडे, विद्यासचिव बी. जी. कुलकर्णी, सहसचिव लक्ष्मण चलगिरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक डी. डी. व्हनकळस, अशोक पाचकुडवे, विजयाश्री गायकवाड, संदीप गायकवाड, ए. एस. नागणे, एन. डी. ताकमोगे, गुरुनाथ मुचंडे, विष्णू चव्हाण, रावसाहेब सुर्वे, धनंजय मुळे यांच्यासह सर्व शाखेतील शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजक संतोष गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अशोक पाचकुडवे यांनी केले तर आभार रावसाहेब सुर्वे यांनी मानले. वा. प्र.

फोटो

१२मोहोळ-सत्कार

ओळी

मोहोळ येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नूतन पदाधिका-यांच्या सत्काराप्रसंगी संतोष गायकवाड व अन्य.

Web Title: Headmasters team with the support of teachers: Tanaji Mane