शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

मुख्याध्यापकांच्या कार्यालयाला सील ठोकले अन् दहावी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:20 IST

मिळकतकर कारवाई; लोकसेवा हायस्कूलचे सील धनादेश वटल्यानंतरच काढणार

ठळक मुद्देहद्दवाढ भागातील थकबाकीदारांवर कारवाई सुरूकर संकलन अधिकाºयांनी शेळगी भागातील पाच नळ कनेक्शन तोडलेहद्दवाढ भागातील इतर वसाहतींमध्ये कारवाई होणार

सोलापूर : महापालिकेचा मिळकतकर थकविणाºया लोकसेवा हायस्कूलने सोमवारी १२ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश कर संकलन अधिकाºयांकडे जमा केला. धनादेश वटल्यानंतरच मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे सील काढणार, असे अधिकाºयांनी बजावले. मात्र धनादेश वटण्याबाबत सांगू शकत नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे कार्यालयात अडकली आहेत, असे मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले. 

मनपाकडील मिळकतकराची थकबाकी न भरल्याने लोकसेवा आणि विडी घरकूल येथील सोशल हायस्कूलच्या मुख्याध्यापकांचे कार्यालय सील करण्यात आले आहे. लोकसेवा हायस्कूलकडे तीन वर्षांपासूनची १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यापोटी सोमवारी मुख्याध्यापक अनिल धोत्रे यांनी १२ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला. धनादेश वटल्यानंतरच मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे सील काढणार, असे कर संकलन प्रमुख पी. व्ही. थडसरे यांनी सांगितले. 

शासनाकडून अनुदान प्रलंबित आहे. दहावीच्या मुलांची प्रवेशपत्रे मुख्याध्यापकांच्या कार्यालयात आहेत. तीन मार्चपासून परीक्षा सुरू होणार आहे. मुलांना प्रवेशपत्रे द्यायची आहेत, असे धोत्रे म्हणाले. मात्र संस्था विद्यार्थ्यांकडून फी घेते. फी न दिल्यास कारवाई करते. मिळकत कर भरायला यापूर्वी अडचण नव्हती. आताच अडचण कशी? वारंवार कळवूनही आपण कर भरला नाही. मनपाला दाद दिली नाही म्हणूनच ही कारवाई झाल्याचे थडसरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुसरीकडे सोशल हायस्कूलने अद्यापही दाद दिलेली नाही. वरिष्ठांच्या आदेशान्वये आणखी कडक कारवाई होईल, असा इशाराही थडसरे यांनी दिला.

करवसुलीला प्रतिसाद- मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी थकीत मिळकतकरावर आकारलेल्या दंडामध्ये ७५ टक्के माफी दिली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जादा वसुली होत आहे. शनिवारी एकाच दिवशी ३६ लाख रुपयांचा कर जमा झाला. सोमवारी ३८ लाख रुपयांचा कर जमा झाल्याचे थडसरे यांनी सांगितले. तीन लाखांपेक्षा अधिकचा कर थकविणाºया १२४ मिळकतदारांची नावे डिजिटल फलकावर लावण्यात येणार आहेत. यावर कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शेळगी येथे पाच नळ तोडले- हद्दवाढ भागातील थकबाकीदारांवर कारवाई सुरू आहे. कर संकलन अधिकाºयांनी सोमवारी शेळगी भागातील पाच नळ कनेक्शन तोडले. याच भागात मंगळवारी कारवाई सुरू राहणार आहे. यानंतर हद्दवाढ भागातील इतर वसाहतींमध्ये कारवाई होणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSSC Resultदहावीचा निकालexamपरीक्षाEducationशिक्षणSchoolशाळा