लोकसभा निवडणूक लढणार नाही, प्रणितीच लढतील; सुशीलकुमार शिंदेंनी दिले संकेत
By Appasaheb.patil | Updated: July 14, 2023 15:11 IST2023-07-14T15:11:20+5:302023-07-14T15:11:54+5:30
सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी काळात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती याच निवडणूक लढविणार आहेत, मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.

लोकसभा निवडणूक लढणार नाही, प्रणितीच लढतील; सुशीलकुमार शिंदेंनी दिले संकेत
सोलापूर : आपली कन्या आमदार प्रणितींच्या कार्यकर्तृत्वाला लोकसभेत अधिक वाव असल्याचे सांगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी काळात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती याच निवडणूक लढविणार आहेत, मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे गुरूवारी सायंकाळी अक्कलकोट रोडवरील एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. आपण स्वत: निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले.
आ. प्रणिती यांचे चौफेर ज्ञान, वाढता जनसंपर्क, पक्षाचे कार्य, विधानसभेचा अनुभव, अनेक भाषांवरील प्रभुत्व आदी बाबींचा विचार करता त्यांच्या कर्तृत्वाला लोकसभेत वाव आहे व तेथे त्यांचा अधिक उपयोग होईल असे आपल्याला वाटते असेही शिंदे म्हणाले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अन्य काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.