हातउसने पैशाच्या कारणावरुन मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:30+5:302021-09-10T04:29:30+5:30
वैराग : घरगुती अडचणीस्तव घेतलेले हातउसने दहा हजार परत न दिल्याच्या कारणावरुन तिघांनी मिळून एकाला बेदम मारहाण ...

हातउसने पैशाच्या कारणावरुन मारहाण
वैराग : घरगुती अडचणीस्तव घेतलेले हातउसने दहा हजार परत न दिल्याच्या कारणावरुन तिघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना वैराग येथे बुधवार घडली. याप्रकरणी वैराग पाेलिसांनी त्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बाळासाहेब विष्णू देशमुख (रा. ढोराळे, वैराग) यांनी फिर्याद दिली आहे. ते बुधवार आठवडी बाजारहाट करून सरपंच दीपक देशमुख यांच्या सोबत गावाकडे निघाले होते. संतनाथ साखर कारखाना तुळशीदास हायस्कूलसमोर बाबा ऊर्फ प्रदीप गोपाळ काकडे (रा. ढोराळे) यांनी अडवून हातउसने घेतलेले दहा हजार रुपये परत दे म्हणून हुज्जत घातली. तेव्हा फिर्यादी बाळासाहेब यांनी बाबा यांना दोन चार दिवसांत पैसे देतो म्हटले. मात्र बाबा यांनी बाळासाहेब यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
यावेळी वैरागहून राहुल हनुमंत काकडे व काका हनुमंत काकडे (रा. ढोराळे) हे दोघे त्या ठिकाणी आले व त्यांनी मोटरसायकलचा आरसा काढून डोक्यात मारला. तसेच बेशुद्ध पडेपर्यंत बेदम मारहाण केली.