शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केले अन् नंतर अत्याचार केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:34 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना; आरोपीचा शोध सुरू : अपहरण प्रकरणाला वेगळे वळण

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याची तक्रार वैद्यकीय चाचणीही करून घेतली़ नव्या जबाबानुसार दोघांवर अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला

मंद्रुप : १२ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीने गुरुवारी पुन्हा जबाब बदलला़ तिने दिलेल्या जबाबानुसार अपहरण करून अत्याचार केल्याचा गुन्हा मंद्रुप पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. तिच्या जबाबानुसार पोलिसांनीही तपासाची दिशा बदलली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली होती़ चार दिवसानंतर ही मुलगी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली़ मला कुणीही पळवून नेले नव्हते, मला पसंत नसलेल्या मुलाबरोबर  लग्न लावणार असल्याने आई-वडिलावर नाराज होऊन मी दुसºया गावात नातेवाईकांकडे गेले होते, असा जबाब या मुलीने दिला होता़ कुटुंबीयांना तो मान्य नव्हता, त्यामुळे तिला घरी नेण्यास त्यांनी साफ नकार दिला़ त्यानंतर या मुलीची रवानगी बाल निरीक्षणगृहात केली.

दुसºया दिवशी या मुलीची आजी स्वत: मंद्रुप पोलीस ठाण्यात हजर झाली़ तिने आपल्याकडे मुलगी आली नव्हती, ती खोटे बोलत असल्याचे सांगितले़ तक्रारीनुसार मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, परंतु मुलीने त्याला प्रतिसाद दिला नाही़ त्यानंतर तिची रवानगी पुन्हा बाल निरीक्षणगृहात केली.

पोलिसांनी दुसºयांदा मुलीचा जबाब घेताना तिने पहिला दिलेला जबाब बदलला़ लग्नाचे आमिष दाखवून आपले अपहरण करण्यात आले़ त्यानंतर अत्याचार केला असा जबाब पोलिसांना दिला. वैद्यकीय चाचणीही करून घेतली़ नव्या जबाबानुसार दोघांवर अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे़ तपास फौजदार गणेश पिंगुवाले हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस