पतीला मारुन पत्नीचे मंगळसूत्र पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST2021-01-17T04:20:29+5:302021-01-17T04:20:29+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वास आप्पाराव भोसले (वय ४९, रा. खरसोळी, ता. पंढरपूर) व त्यांची पत्नी वंदना भोसले ...

He killed his husband and stole his wife's mangalsutra | पतीला मारुन पत्नीचे मंगळसूत्र पळवले

पतीला मारुन पत्नीचे मंगळसूत्र पळवले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वास आप्पाराव भोसले (वय ४९, रा. खरसोळी, ता. पंढरपूर) व त्यांची पत्नी वंदना भोसले हे मोटारसायकलवरून शिंदे वस्ती (खरसोळी) येथील शेतातील घरी जात होते.

त्या दरम्यान रामचंद्र धर्मा पवार, समाधान मच्छिंद्र पवार, अतुल धर्मा पवार, छगन अज्ञान पवार (सर्व रा. खरसोळी) हे दोन मोटारसायकलवरून आले. त्यापैकी रामा धर्मा पवार याने मोटारसायकलने भोसले यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यामुळे भोसले हे रोडवर पडले.

त्यावेळी रामचंद्र पवार याने भोसले यांना तुला लय माज आला आहे का, तुझ्याकडे पाहून घेतो असे म्हणून शिवीगाळ केली. त्याचबरोबर रामचंद्र पवार, समाधान यांनी लाथाबुक्क्यांनी मारले. छगन पवार यानेही पाठीत लाथ मारुन ढकलून दिले, तर अतुल पवार यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच वंदना यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील १ तोळ्याचे मणिमंगळसूत्र व १ तोळ्याची बोरमाळ तोडून जबरीने काढून घेतली. त्यांना रोडवर ढकलून दिले. या प्रकरणी वरील चारजणांविरुद्ध विश्वास भोसले यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: He killed his husband and stole his wife's mangalsutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.