मातीचे पैसे देण्यावरून लाथा-बुक्क्या मारून दात तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST2021-04-02T04:22:44+5:302021-04-02T04:22:44+5:30

म्हाळाप्पा दशरथ खांडेकर असे जखमीचे नाव आहे. हणमंतगाव येथील म्हाळप्पा खांडेकर हे १ एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वतःच्या ...

He kicked and punched and broke his teeth | मातीचे पैसे देण्यावरून लाथा-बुक्क्या मारून दात तोडला

मातीचे पैसे देण्यावरून लाथा-बुक्क्या मारून दात तोडला

म्हाळाप्पा दशरथ खांडेकर असे जखमीचे नाव आहे.

हणमंतगाव येथील म्हाळप्पा खांडेकर हे १ एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वतःच्या शेतात ट्रॅक्‍टरने शेती लेव्हल करीत होते. यावेळी शेजारी राहणारे हनुमंत खांडेकर, समाधान खांडेकर, संतोष खांडेकर यांनी मी विश्वंभर खांडेकर यांच्या ट्रॅक्टरने माझ्या शेतात माती टाकली होती. ती माती शेतामध्ये लेव्हल करीत असताना विश्वंभर खांडेकर यांचा मुलगा हनुमंत खांडेकर यांनी तेथे येऊन ‘आमच्या मातीचे पैसै द्या,’ असे म्हणून माझ्या तोंडावर बुक्क्या मारल्या. यात समोरचा सुळा दात तुटून पडला तर वामन खांडेकर, संतोष खांडेकर व समाधान खांडेकर या तिघांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली,असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.

----

Web Title: He kicked and punched and broke his teeth