शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

‘तो’ वानर अनेकांचा मित्र झालेला, पण शेवटी केला वृद्धेचा घात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 8:09 PM

अरूण लिगाडे  सांगोला : नर जातीचे हे वानर गावात आल्यानंतर सुरुवातीला ग्रामस्थांनी मारुतीचा अवतार म्हणून या त्याच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष ...

ठळक मुद्देफेबु्रवारी महिन्यात या वानराला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होतागेल्या तीन महिन्यांपासून हा नर जातीचा वानर गावात वास्तव्यासवानराला पकडण्यासाठी वन विभागाला सूचना करूनही त्यांच्याकडून वानराचा बंदोबस्त न झाल्याने कृष्णाबाई सुतार यांचा बळी गेला

अरूण लिगाडे सांगोला : नर जातीचे हे वानर गावात आल्यानंतर सुरुवातीला ग्रामस्थांनी मारुतीचा अवतार म्हणून या त्याच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष केले. अनेक  दिवस याच गावात राहिल्याने तो अनेकांचा मित्र झालेला़ हा माणसाळलेला  वानर असे करेल, असे कोणालाही वाटले नव्हते, पण कोण त्याच्या खोड्या केल्या की तो चावा घ्यायचा, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

सांगोला तालुक्यातील घेरडी या गावात बुधवारी घडलेल्या घटनेनंतर या गावात ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली. घडनेमुळे गावकरी सुन्न होते. मात्र माणसाळलेले वानर असे का वागले याचा मात्र गावकºयांना मोठा धक्का बसला आहे.

या वानराच्या संदर्भातील अनेक प्रसंग गावकºयांनी ऐकविले. एकदा गावात आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रम संपेपर्यंत ठाण मांडून होते. तसे पाहिले तर तो माणसाळलेलाही असल्याचे लोक सांगतात, पण लहान मुलांनी त्याची खोडी काढली की तो त्यांच्यावर धावून हाताचा चावा घ्यायचा, असेही ग्रामस्थ सांगतात.

गावानजीक जवाहर विद्यालयातील शालेय मुलांना या वानराचा खूप उपद्रव होऊ लागल्याने मुख्याध्यापकांनी वन विभागास लेखी पत्र देऊन त्याला पकडण्याची विनंती केली होती.

गावात डॉल्बी, स्पीकरचा आवाज आला, अगर ज्या ठिकाणी कार्यक्रम असे त्या ठिकाणी तो कार्यक्रम संपेपर्यंत बसून राहायचा़ त्याला संगीताची आवड निर्माण झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील घंटागाडीच्या सायरनचा आवाज सुरु झाला की तो घंटागाडीवर पटकन जाऊन बसायचा. मग घंटागाडीचे गावातील काम संपले की तो पुन्हा चिंचेच्या झाडाखाली येत असे. 

फेबु्रवारी महिन्यात या वानराला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर ७ मार्च रोजी गोल्डन चौकात दुपारी ३ ते ५ या कालावधीत अंगावर जाळे टाकून पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याने जाळे हिसकावून पळ काढला. त्यानंतरही वनविभागाचे कर्मचारी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु तो अद्याप सापडला नाही, असे सांगण्यात आले.

यांना घेतला वानराने चावा- या नर वानराने गावातील महादेव जगधने, आदिनाथ मणेरी, आबा खताळ, पप्पू कांबळे, सोनाबाई गेजगे, जवाहर विद्यालयातील सारिका गेजगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ, महिला, शालेय विद्यार्थ्यांवर हल्ले करून हाताला चावा घेतल्याचे नागेश ककमिरे, जावेद आतार व परमेश्वर गेजगे यांनी सांगितले.

सरपंच, गावातील पुढाºयांनी वन विभागाला या नर वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी लेखी, तोंडी केली होती. परंतु वनविभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे वानराच्या हल्ल्यात माझ्या आईचा बळी गेला आहे. अशी घटनांची वाट न पाहता या वानराला पकडून गाव भयमुक्त करावे़- संतोष सुतार 

सदाभाऊचा बनला मित्र- हा वानर गावातील सदाभाऊ खुळपे यांना मात्र काहीही करत नसे. उलट तो त्यांच्याजवळ जातो. जवळ गेल्यानंतर सदाभाऊ त्याचे अंग टॉवेलने पुसतात, त्याला पिण्यास पाणी देतात, खायला देतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या गोंजारण्यामुळे वानर त्यांचा चांगला मित्रही बनला आहे. मात्र जेव्हा या वानराने गावातील कृष्णाबाई सुतार यांच्यावर हल्ला करून त्या मयत झाल्याचे समजले तेव्हा सदाभाऊंना विश्वासच बसला नाही. 

गेल्या तीन महिन्यांपासून हा नर जातीचा वानर गावात वास्तव्यास आहे. वानराला पकडण्यासाठी वन विभागाला सूचना करूनही त्यांच्याकडून वानराचा बंदोबस्त न झाल्याने कृष्णाबाई सुतार यांचा बळी गेला आहे. वनविभागाने मृताच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत करावी़- कय्युम आत्तार, सरपंच, घेरडी

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात